नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील 17 ग्रामपंचायतीसाठी झालेल्या मतमोजणीत शिंदे गटाचे वर्चस्व दिसून आले.एकूण 18 पैकी 10 वर विजय मिळविला तर भाजपाने 8 ग्रामपंचायतीत विजय मिळविला.
नंदूरबार तालुक्यातील 17 ग्रामपंचाय मधील शिंदे गटाच्या ताब्यात कोठडे, करणखेडा, धानोरा, खैराळे,तिसी, राकसवाडे,ढंढाणे,तलवाडे बु,घुली,ओसर्ली या ग्रामपचायतीत विजयी झाल्या.
तर भाजपाने रनाळे, रजाळे, आसाणे, घोटाणे, सातुर्खे, अमळथे, चौपाळे या ग्रामपंचायतीत विजय मिळविला आहे.तर याधीच कान्हळदे ग्रामपंचायत बिनविरोध झाली असून भाजपच्या ताब्यात आहे.








