नंदुरबार l
शहरातील काकासाहेब नगरात मनाई आदेशाचे उल्लंघन करुन डिजे वाजवून नाचतांना आढळून आल्याने पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार शहरातील काकासाहेब नगरात शासनाने दिलेल्या प्रतिबंधात्मक मनाई आदेशाचे उल्लंघन करुन डिजे वाजंत्रीवर रविंद्र पांडू पाटील, शुभम रविंद्र पाटील, राहूल दिलीप गुलाले हे नाचतांना आढळून आले.
तसेच डिजे वाहन चालक विलास ज्ञानेश्वर धात्रक व विजय धनंजय मराठे हे डिजे चालवितांना आढळून आले. याबाबत सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक कृष्णा पौलाद पवार यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात पोलिस अधिनियम कलम ३८ (१) (क) चे उल्लंघन १३६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.इसमल पावरा करीत आहेत.








