नंदूरबार l प्रतिनिधी
विखरण येथील ह.भ.प.वसंतराव पाटील यांना खानदेशातील मानाचा जेष्ठ वारकरी पुरस्कार प्रदान करण्यात आला.

खांदेश वारकरी संप्रदायातील मानाचा खांदेश वारकरी सेवा मंडळ, धुळे तर्फे आयोजित वै.प्रातःस्मरणीय ह.भ.प.विठ्ठलबाबा चौधरी (मोठे बाबा) यांच्या पुण्यतिथीनिमित्त जेष्ठ वारकरी पुरस्कार विखरण ता.नंदूरबार येथील जेष्ठ वारकरी ह.भ.प.वसंतराव दोधु पाटील (आबा) यांना काल धुळे येथे मोठ्या दिमाखदार सोहळ्यात पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी विखरण व पंचक्रोशीतील वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या पुरस्काराने ह.भ.प.वसंतराव पाटील यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.








