Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अभिनव विद्यालयातील खेळाडूंचे शालेय जिल्हास्तरीय विविध स्पर्धेत घवघवीत यश

team by team
December 19, 2022
in Uncategorized
0
अभिनव विद्यालयातील खेळाडूंचे शालेय जिल्हास्तरीय विविध स्पर्धेत घवघवीत यश
नंदुरबार  l
येथील सरदार पटेल शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अभिनव विद्यालयातील विद्यार्थी खेळाडूंनी जिल्हास्तरीय विविध खेळांच्या स्पर्धेमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. या स्पर्धेतील यशस्वी अभिनव विद्यालयातील विद्यार्थ्यांची विभागस्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
क्रीडा युवक सेवा संचालनालय व जिल्हा क्रीडा विभागामार्फत आयोजित शालेय जिल्हास्तरीय विविध खेळांची स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत अभिनव विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. त्यात जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत सादिकबेग मिर्झा व देव जाधव यांची निवड विभागीय स्तरावर झाली. जिल्हास्तरीय नेटबाँल स्पर्धेत मुलाच्या 14 व 17 वयोगटातील व मुलीच्या 14 वयोगटातील संघ विभागीय स्तरावर निवडला गेला ,जिल्हास्तरीय डॉजबॉल स्पर्धेत मुलाच्या 17 वर्षातील वयोगटातील व मुलीच्या 19 या वयोगटातील संघ , जिल्हास्तरीय रोपस्किपिंग स्पर्धेत मुलांच्या 14, 17 व 19 वयोगटातील तर मुलींच्या 17  व 19या वयोगटातील खेळाडू संघात निवडले गेले ,
जिल्हास्तरीय रस्सीखेच स्पर्धेत मुलांच्या 17 व 19 या वयोगटातील व मुलीच्या 19 या गटातील संघ, जिल्हास्तरीय आट्यापाट्या स्पर्धेत मुलाच्या 19 या वयोगटातील व मुलीच्या 14 या वयोगटातील संघ विभागीय स्पर्धेसाठी निवडले गेले.142 विद्यार्थी विविध स्पर्धेत विभागीय स्पर्धेत निवडले गेले. यशस्वी खेळाडूंना क्रीडा शिक्षक संजय पाटील, रमेश मलखेडे, रामकृष्ण आघाव, पंकज आहिरे, युवराज पाटील, धनराज अहिरे यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वितांचे संस्थेचे सचिव डॉ.राजाराम पाटील, संस्थेचे शालेय समिती चेअरमन ॲड. प्रभाकर चौधरी, संस्थेचे समन्वय प्रमोद पाटील, प्राचार्य तारकेश्वर पटेल, पर्यवेक्षक राजीव संगपाळ व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक केले.
बातमी शेअर करा
Previous Post

पेन्शनर दिनानिमीत्त 75 वर्ष पूर्ण करणाऱ्या सभासदाचा सन्मान 

Next Post

मंगळ बाजार व्यापारी असोशियनतर्फे महिलांना शालींद्वारे मिळाली मायेची ऊब 

Next Post
मंगळ बाजार व्यापारी असोशियनतर्फे महिलांना शालींद्वारे मिळाली मायेची ऊब 

मंगळ बाजार व्यापारी असोशियनतर्फे महिलांना शालींद्वारे मिळाली मायेची ऊब 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

November 4, 2026
दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

November 1, 2026
खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

November 1, 2026
सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

November 1, 2026
भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

November 1, 2026
सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

October 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add