शहादा | प्रतिनिधी
शहादा शहरासह तालुक्यात काल सायंकाळी ७ वाजेपासून विजेच्या प्रचंड कडकाडाटासह मुसळधार पाऊस पडला. यंदाच्या वर्षातिल हा सर्वात जोरदार पाऊस आहे. यापावसामुळे शहादा शहर जलमय झाले. यासह तालुक्यातील ९ मंडळामध्ये अतिवृष्टी झाली.तर शहरात १४६ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
काल दि.७ ऑगस्ट रोजी शहादा शहरासह तालुक्यात मुसळधार पावसाने झोडपले,शहादा शहरातील अनेक भागात पाणी साचले.शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या पासून बायपास पर्यंत जाणार्या नविनच तयार केलेल्या डोंगरगाव रस्त्याला यंदाही नदिचे स्वरुप प्राप्त झाले होते.पाटाचे पाणी रस्त्यावरुन वाहत आहे. नविन गटारी कुचकामी ठरल्या आहेत. शहरातील जुन्या तहसिल कार्यालयाच्या जागी नविन प्रांत कार्यालय आताच बनविण्यात आले आहे. त्याच्या आवारात प्रचंड पाणी साचले आहे. प्रांत कार्यालयाला तलावाचे स्वरुप आले आहे.शहरातील न्यायालय आणि प्रांताधिकारी कार्यालय परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून या दोन्ही कार्यालयातील महत्त्वाची कागदपत्रे ओले झाल्याची भीती व्यक्त केली जात आहेे.शहादा न्यायालयांच्या सर्व इमारतिल पाणी शिरले आहे सुमारे दोन फुट पाणी न्यायालयात शिरले असुन. न्यायालय आवाराला पाण्याचा वेढा पडला आहे. यामळे न्यायालयाचे काम ठप्प असुन बार असोसिएशनतर्फे याबाबत प्रशाशनाला निवेदन देण्यात येणार आहे.शहरात मुसळधार पावसामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाची इमारत, स्टेट बँक परिसर.शासकीय विश्रामगृह. नगरपालिकेच्या इमारती जवळील परिसर व दुकानांमध्ये पाणी शिरले आहे. या पावसामुळे शहराच्या वीजपुरवठा खंडित झाला आहे. शहरात साचलेल्या पाण्यातून नागरिकांना मार्ग काढावे लागत आहे. शहादा शहरासह तालुक्यात काल सायंकाळी ७ वाजेपासून ते रात्री ३ वाजेपर्यंत विजेच्या प्रचंड कडकाडाटासह मुसळधार पाऊस झाला.या पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर वृक्ष उन्मळुन पडले असुन ते बाजुला करण्याचे काम सुरू आहे.पावसामुळे नगरपालिकेचा भोंगळ कारभार एकदा पुन्हा समोर आला असुन शहरातील पाण्याच्या निचर्याची कायमस्वरूपी व्यवस्था करावी अशी मागणी होत आहे.
शहादा तालुक्यात मंडळनिहाय पर्जन्य
शहादा : १४६ मिमी
कलसाडी:१२८ मिमी
प्रकाशा: ८६मिमी
ब्राह्मणपुरी:९२ मिमी
म्हसावद : ८२ मिमी
मोहिदे त.श.: १०५ मिमी
वडाळी: ४१ मिमी
असलोद: ९० मिमी
मंदाणा: ८२ मिमी
सारंगखेडा: ८६ मिमी
तालुका एकुण:९३८ मिमी.