नंदूरबार l प्रतिनिधी
क्रेडिट ऍक्सेस ग्रामीण लि.च्या वतीने दहावीतील गुणवंत विद्यार्थिनींना जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या हस्ते शिष्यवृत्ती वाटप करण्यात आली.
क्रेडिट एक्सेस ग्रामीण लिमिटेड मायक्रो फायनान्सच्या वतीने सन २०२०. २०२१ या वर्षामध्ये १० वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थिनींना क्रेडिट एक्सेस ग्रामीण लिमिटेडच्या वतीने नंदूरबार येथील जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व प्रमाणपत्र जिल्हाधिकारी कार्यालय नंदूरबार येथे वाटप करण्यात आले. क्रेडिट एक्सेस ग्रामीण लिमिटेड मार्फत विविध समाजिक कार्यक्रम राबवले जातात त्यातील हा एक उपक्रम होता. शिष्यवृत्ती दिलेल्या विद्यार्थिनींमध्ये दिव्या जगदीश बागुल ( पुणे), जयश्री मधुकर मराठे ( डी.आर.कॉलेज, नंदूरबार) यांचा समावेश समावेश आहे.
या कार्यक्रमास क्रेडिट एक्सेस ग्रामीण लिमिटेडचे
धुळे विभागणी अधिकारी सचिन घाटगे, क्षत्रिय अधिकारी सिद्धार्थ सुरडकर, शाखा व्यवस्थापक दिपक कदम यांच्यासह पालक जगदीश बागुल, किराबाई जगदीश बागुल, मधुकर मराठे, प्रतिभा मराठे आदींची उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून संस्थेच्या उपक्रमाची प्रशंसा केली.