नवापूर | प्रतिनिधी
येथील पालिकेमार्फत मेवाड रत्न वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांचा अश्वारूढ पुतळा असलेल्या स्मारकाचे भूमिपूजन व हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे भूमिपूजन नगराध्यक्षा हेमलता पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री. छत्रपती शिवाजी महाराज व महाराणा प्रतापसिंह यांचा अश्वारूढ पुतळा शहरात असावा, ही मागणी अनेक वर्षापासून नागरिकांची होती. त्या अनुषंगाने जागाही पाहणी झाली होती. आश्वासनाची पूर्ती करण्यासाठी स्टेट बँकेजवळ पालिकेच्या श्री सुरुपसिंग हिर्या नाईक टाऊन हॉलच्या समोरील खुल्या जागेवर महाराणा प्रतापसिंह यांचा अश्वारूढ पुतळा तर वनिता विद्यालय व महाराष्ट्र बँकेच्या समोरील जागेवर श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळ्याच्या स्मारकाचे भूमिपूजन आज नगराध्यक्षा हेमलता पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
सकाळी महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याच्या स्मारकाची भूमिपूजनासाठी प्रा.उमेश पाटील यांनी सपत्नीक जागेचे विधिवत पूजन पुरोहितांच्या उपस्थितीत केले.
श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या जागेचे विधिवत पूजन मधुकर पाटील यांनी सपत्नीक केले.शहरात दोन थोर युग पुरुषांचे अश्वारूढ पुतळे उभारले जाणार आहेत, ही शहरवासीयांसाठी अभिमानाची आणि गर्वाची बाब आहे. या दोन्ही पुतळ्यांच्या सुशोभीकरणासाठी आ.शिरीषकुमार नाईक यांनी निधी उपलब्ध करून दिला.
आता आपल्याला पुतळ्यांसाठी लोकसहभाग उभारावा लागणार आहे. सर्व शहरवासीयांनी हातभार लावला तर महाराणा प्रतापसिंह व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांचे लोकार्पण सोहळा लवकरच होवू शकतो असा विश्वास प्रा.गोपाळ पवार, किरण टिभे, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख हसमुख पाटील, मनोज बोरसे, नगरसेवक नरेंद्र नगराळे यांनी मनोगतातून व्यक्त केला.
प्रा.कमलेश पाटील यांनी सूत्रसंचलन केले. नगरसेवक विशाल सांगळे यांनी आभार मानले.कार्यक्रमाला नगरसेवक गिरीष गावीत, महेंद्र दुसाने, नगरसेविका अरुणा पाटील, बबिता वसावे, मंगला सैन, मंजू गावीत, मिनल लोहार, सविता नगराळे, सुरेखा जगदाळे, माजी नगरसेवक अजय पाटील, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश पाटील, दिपक वसावे, अनिल वारुडे, चंद्रकांत नगराळे, सुरेश राजपूत, विनू पाटील, शामराव आतारकर, संदीप पाटील, रोहन पाटील, सुभाष कुंभार, विजय सैन, जितेंद्र अहिरे, आर.वाय.पाटील, हेमंत पाटील, रामकृष्ण पाटील, अनिल पाटील, मनोहर नगराळे, धर्मेश पाटील, मुकेश गावीत, मंगेश येवले, महेंद्र जाधव, विनोद सूर्यवंशी, निलेश पाटील, प्रेमेंद पाटील, महेश पाटील,शामराव आतारकर, वनिता विद्यालयाचे शिक्षक यांच्यासह शहरातील राजकीय पक्षाचे, सामाजिक क्षेत्रातील नागरिक या ऐतिहासिक प्रसंगाला उपस्थित होते.