Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्ह्यात आजपासून गोवर रुबेला विशेष लसीकरण मोहीम

team by team
December 15, 2022
in आरोग्य
0
जिल्ह्यात आजपासून गोवर रुबेला विशेष लसीकरण मोहीम
नंदुरबार  | प्रतिनिधी
जिल्हा परिषद आरोग्य विभाग अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील सर्व आरोग्य संस्थांमार्फत  शासनाच्या निर्देशानुसार राज्यातील ९ महिने ते ५ वर्ष वयोगटातीलबालके ज्यांना गोवर रुबेला पहिली मात्रा  किंवा गोवर रुबेला दुसरी मात्रा  दिलेली नाही अश्या सर्व बालकांचे गोवर रुबेला विशेष लसीकरण मोहीम घेण्यात येणार  आहे.
या मोहिमेची पहिली फेरी  दि.१५ डिसेंबर ते २५ डिसेंबर तसेच दुसरी फेरी १५ जानेवारी ते २५ जानेवारी  या कालावधीत राबवण्यात येत आहे.गोवर रुबेला लसीचा चुकलेला डोस या विशेष लसीकरण मोहिमे मध्ये  ९ ते १२ महिन्यांमध्ये गोवर रुबेलाचा पहिला डोस व १६ ते २४महिन्यांमध्ये गोवर रुबेलाचा दुसरा डोस देण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी मनीषा खात्री,  मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार रघुनाथ गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार डॉ. संदीप पुंड यांच्या संनियंत्रनाखाली ही विशेष लसीकरण मोहीम राबण्यात येणार आहे.या करीता जिल्ह्यातील ६१ प्राथमिक आरोग्य केंद्र व २९० आरोग्य उपकेंद्र पुरेश्या लस साठ्यासह सज्ज ठेवण्यात आलेले आहेत.
गोवर प्रतिबंधक लसीचा पहिला व  दुसरा डोस संदर्भात शहरी व ग्रामीण भागातील ९ महिने ते १२ महिने तसेच १६ महिने ते २४ महिने वयोगटातील पात्र लाभार्थीची माहिती संकलित करण्यात आली आहे.
वंचित बालकांना पहिला डोस व दुसरा डोस देण्यात येणार आहे मात्र दोन्ही डोस मधील अंतर किमान २८ दिवसाचे असले पाहिजे याबाबत खबरदारी घेण्यात येणार आहे. नंदुरबार जिल्ह्यात पहिल्या डोस साठी ९६२ तर दुसर्‍या डोस साठी ३४६ अपेक्षित लाभार्थी आहेत व या मोहिमेकरिता ६२ लसीकरण सत्राचे आयोजन आरोग्य विभागामार्फत करण्यात आलेले आहे.
तरी जिल्ह्यातील राबवण्यात येणारी विशेष लसीकरण मोहीम १०० टक्के यशस्वी करण्तासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने मा. जिल्हाधिकारी मनीषा खात्री, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार रघुनाथ गावडे तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप पुंड, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ.संजीव वळवी यांनी केले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

सारंगखेडा यात्रेत ७० लाखाची शनाया व ५१ लाखाचा शेरा ठरतोय आकर्षण

Next Post

नवापूर येथे महाराणा प्रतापसिंह व छत्रपती शिवरायांचे अश्‍वारुढ स्मारकाचे भुमिपूजन

Next Post
नवापूर येथे महाराणा प्रतापसिंह व छत्रपती शिवरायांचे अश्‍वारुढ स्मारकाचे भुमिपूजन

नवापूर येथे महाराणा प्रतापसिंह व छत्रपती शिवरायांचे अश्‍वारुढ स्मारकाचे भुमिपूजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

डॉ.विजयकुमार गावितांच्या प्रकृतीत सुधारणा; नवसपूर्तीसाठी २२ किलोमीटरची पदयात्रा

November 4, 2026
दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

दीपावलीनिमित्त कार्यानुभवातून विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक आकाशकंदील

November 1, 2026
खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

खोकराळे येथे राष्ट्रीय एकता दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतली एकतेची शपथ

November 1, 2026
सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

सैनिकी शाळेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

November 1, 2026
भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

भालेर येथे राष्ट्रीय एकता दिवस उत्साहात साजरा

November 1, 2026
सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

सरदार वल्लभभाई यांच्या कार्याच्या स्मरणार्थ आयोजित भव्य एकता रॅलीत डॉ. हिना गावित, डॉ. सुप्रिया गावित यांचा सहभाग

October 31, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add