म्हसावद l प्रतिनिधी
शहादा येथील सानेगुरुजी मित्र मंडळाने 84 वयातही उल्लेखनीय कार्या करणाऱ्या जेष्ट नागरिक ॲड
गोविंदभाई विठ्ठल पाटील यांच्या माणक चौधरी, गुलाबराव पवार यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
नुकताच वडछील येथील द्रोणागिरी पब्लिक स्कूल मध्ये गरजू विध्यार्थ्यांना स्वेटर वाटपाचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ऍड गोविंदभाई पाटील होते.
याच कार्यक्रमात ऍड गोविंद पाटील यांच्या सत्कार करण्यात आला.या वेळी संस्थेचे चेअरमन मोहन पाटील, सानेगुरुजी मित्रमंडळाचे अध्यक्ष माणक चौधरी,अवंतिका फॉउंडेशनच्या अध्यक्षा पल्लवी प्रकाशकर, सचिव गुलाबराव पवार, जायन्ट्सच्या आशा चौधरी,विजया पाटील प्रल्हाद पाटील, युवराज अलकरी, रियान मोटे आदी उपस्तिथ होते








