नवापूर l प्रतिनिधी
राष्ट्रवादी मंथन वेध भविष्याच्या नवापूर तालुका राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी तर्फे शहरातील अग्रवाल भवन येथे शिबिर मेळावा आयोजित करण्यात आले होता
.या कार्यक्रमात राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे,माजी आमदार शरद गावीत,जिल्हा उपाध्यक्ष अमृत लोहार,जि.प सदस्य सुनिल गावीत,तालुका अध्यक्ष विनायक गावीत,माजी पं.स उपसभापती उदेसिंग गावीत,अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष इंद्रीस टिनवाला,शहर अध्यक्ष शरद पाटील,नगरसेवक खलील खाटीक,सुनिल वसावे,मनोज वळवी,रोबिन नाईक,इलेश गावीत सह सर्व राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे जि.प सदस्य, पं.स सदस्य, सरपंच,व पदधिकारी मोठया संख्यने उपस्थित होते.याप्रसंगी राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाचे लाईव्ह प्रेक्षपण स्किन व्दारे दाखविण्यात आले.
या नंतर उपस्थित मान्यवराच्या हस्ते नवनियुक्त जि.प सदस्य, सरपंच, उपसरपंच,सदस्य यांच्या सत्कार करण्यात आला.यावेळी माजी आमदार शरद गावीत म्हणाले की, मी सर्व प्रथम शरदचंद्र पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो.शरद पवार हा नेता सर्वाना घेऊ चालणारा नेता आहे.त्यांनी आदिवासी समाजासाठी असंख्य योजना आणल्या.व आदिवासी समाजावर होणारा अन्याय व विकासासाठी स्वतंत्र मंञालय सुरु करुन बजेट मध्ये नऊ टक्के तरतुद केली.
या नंतर राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे म्हणाले आज जे मंथन शिबिर आहे त्याने समुद्र मंथनाची आठवण येते.मंथन म्हटले म्हणजे सर्व प्रकारचे रत्ने निघाली होती.यात मोठा प्रश्न पडला होता की विष कोणी धारण करावे याच प्रकारे माजी आमदार शरद गावीत यांनी विष धारन केले आहे.याचा अर्थ असा की शरददादा गावीत यांनी स्वता विष प्राशन करुन कार्यकत्यांनसाठी व पक्षासाठी अमृत देण्याचे काम करीत आहे.या नंतर जिल्हा उपाध्यक्ष अमृत लोहार म्हणाले राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांना शताआयुषीचा शुभेच्छा देत पक्षसंघटन करुन पुढील निवडणुकींना सामोरे जाण्यासाठी सर्वानी कटीबंध्द व्हावे अशा सुचना दिल्या.
नंतर तालुका अध्यक्ष विनायक गावीत,रोबिन नाईक,नगरसेवक खलील खाटीक यांनी पण आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे सुञसंचलन राष्ट्रवादी युवक जिल्हा उपाध्यक्ष इलेश गावीत यांनी केले तर आभार जि.प सदस्य सुनिल गावीत यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनोज गावीत,प्रकाश गावीत,अतुल ठिंगळे,सत्यपाल वळवी,दिलीप गावीत यांनी परीश्रम घेतले.








