म्हसावद l प्रतिनिधी
ग्रामपंचायत जाम ता.शहादा येथे जल जीवन मिशन योजनेचे खा. डॉ.हिना गावित व आ. राजेश पाडवी यांच्या आदेशानुसार भूमिपूजन खेडदिगर गटाच्या जिल्हा परिषद सदस्या कु.वंदनाताई पटले यांच्या हस्ते करण्यात आले.
जल जीवन मिशन योजनेअंतर्गत गावात 45 हजार लिटराची टाकी,सिंचन विहीर,तर जाम व नवेजामपाडा येथे गावंतर्गत नवीन अंडरलाईन पाईपलाईन,अश्या तीन कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
आजच्या कार्यक्रमास्थळी जाम सरपंच ईश्वर वाघ,निलेश पाटील भागापूर,दामडदा सरपंच हरेराम मालचे,उपसरपंच डॉ.विजय चौधरी,ग्रामसेवक नारायण पवार,उपसरपंच सुनील पवार ग्रा.पं.सदस्य अनिल चव्हाण,ग्रा.पं सदस्य पूनम चव्हाण,ग्रा.पं.सदस्या विमलाबाई चव्हाण,सुभाष वाघ प्रशांत पवार,नवल चव्हाण,धारासिंग चव्हाण,यादव पवार,बोमराज चव्हाण,गब्बर चव्हाण,एकनाथ चव्हाण,तथा ग्रामस्थ कार्यकर्ते उपस्थित होते.








