नंदुरबार l प्रतिनिधी
तळोदा शहरातील भन्साली प्लाझा येथील दुकान फोडून चोरट्यांनी ६० हजार रुपये किंमतीचे स्पेअर पार्ट चोरुन नेल्याची घटना घडली.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नवापूर येथील सुनिल द्वारकादास ठाराणी यांचे तळोदा शहरातील भन्साली प्लाझा येथे अंबिका स्पेअर पार्ट दुकान आहे. सदर दुकान चोरट्यांनी फोडून त्यातील ६० हजार रुपये किंमतीचे स्पेअर पार्ट चोरुन नेले. याबाबत सुनिल ठाराणी यांच्या फिर्यादीवरुन तळोदा पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.हर्षल साळुंखे करीत आहेत.









