नंदुरबार l

शहादा तालुक्यातील कमरावद येथे पोलिस, जिल्हाधिकारी व वनक्षेत्रपाल यांच्याकडे तक्रारी अर्ज केल्यचायिा कारणावरुन एकास घरात घुसून मारहाण केल्याप्रकरणी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, शहादा तालुक्यातील कमरावद येथील कृष्णा ब्रिजलाल कोळी यांनी पोलिस अधिक्षक, जिल्हाधिकारी व शहादा वनक्षेत्रपाल यांच्याकडे तक्रारी अर्ज केला. या कारणावरुन कृष्णा कोळी यांच्या घरात विकास शांताराम कोळी, दीपक शांताराम कोळी, भटू शांताराम कोळी, भैय्या राजाराम कोळी, शांताराम शंकर कोळी, राजाराम शंकर कोळी, कविता भटू कोळी व ताईबाई नामदेव कोळी यांनी अनाधिकृतपणे प्रवेश केला.
तसेच विकास कोळी व दीपक कोळी यांनी कृष्णा कोळी यांना काठी व हाताबुक्यांनी मारहाण केली. इतरांनी शिवीगाळ करीत जिवेठार मारण्याची धमकी दिली. याबाबत कृष्णा कोळी यांच्या फिर्यादीवरुन शहादा पोलिस ठाण्यात आठ जणांविरोधात भादंवि कलम १४३, १४७, ४५२, ३२४, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र पाटील करीत आहेत.









