Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अक्कलकुवा येथील महेश तंवर यांचे व त्यांच्या कुटुंबियांच्या अवैध धंद्यांची चौकशी करण्याची आ.आमश्या पाडवी यांची मागणी

team by team
December 11, 2022
in क्राईम
0
आनंदाची शिधा या योजनेने केली गरिबांची थट्टा :  आ.आमश्या पाडवी
अक्कलकुवा l प्रतिनिधी
         अक्कलकुवा येथील महेश परमसुख तंवर यांचे व त्यांच्या कुटुंबियांच्या अवैध धंद्यांची चौकशी होऊन त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी  आमदार आमश्या पाडवी यांनी जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांनी केली आहे.
         विधान परिषदेचे सदस्य आमदार आमश्या पाडवी यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे की, अक्कलकुवा येथील महेश परमसुख तंवर व त्यांच्या परिवारातील सुरेश परमसुख तंवर, रमेश परमसुख तंवर हे गेल्या अनेक वर्षापासून अक्कलकुवा शहरात बिन बोभाट पणे खाण्याच्या तेलात भेसळ करीत आहेत.  बनावट लेबल तयार करुन त्यांची पॅकेजिंग करून बाजारपेठेत भेसळ तेलाची विक्री करीत आहेत परिणामी नागरिकांना भेसळ तेलामुळे विविध प्रकारच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे .
या व्यवसायाकडे शासनाच्या अन्न भेसळ व औषध प्रशासन या विभागाचे पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे. तसेच महेश परमसुख तंवर व त्यांचे कुटुंबीयांचे अक्कलकुवा शहरात, तालुक्यात व बाहेरच्या राज्यामध्ये अनेक प्रकारचे अवैध धंदे आहेत .दारु बनविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या महु फुलांची अक्कलकुवा शहरात राजरोसपणे विक्री होत आहे.याकडे स्थानिक पोलीसांनी व तालुका प्रशासनाने पुर्णतः दुर्लक्ष केले आहे असा आरोप केला आहे.
निवेदनात पुढे नमुद केले आहे की, अफीम सारख्या मादक पदार्थांच्या विक्री प्रकरणी त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीवर गुजरात राज्यात गुन्हा दाखल झालेला आहे असे असताना देखील सदर परिवार अवैध धंद्यात पूर्णपणे बुडाला असून अवैध धंद्यांच्या माध्यमातून त्यांनी कोट्यावधी रुपयांची मालमत्ता जमवलेली आहे आणि या मालमत्तेच्या जोरावर गरीब आणि अशिक्षित जनतेची दिशाभूल करुन त्यांचे आरोग्य आणि जीवाशी खेळण्याचा प्रकार सुरु आहे. त्यामुळे संबंधित कुटुंबीयांची चौकशी करून त्यांच्या कुटुंबियांवर अन्न भेसळ प्रतिबंधक तसेच इतर आवश्यक  कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.योग्य चौकशी न झाल्यास महेश परमसुख तंवर यांच्या अवैधंद्याविरुद्ध तालुक्यातील जनता रस्त्यावर उतरेल असा इशारा आमदार आमश्या पाडवी यांनी दिला आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसतर्फे सोमवारी ओपन कुस्ती दंगल

Next Post

कमरावद येथे एकास मारहाण, आठ जणांविरोधात गुन्हा

Next Post
चौपाळे येथे एकास लोखंडी पाईपने मारहाण, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

कमरावद येथे एकास मारहाण, आठ जणांविरोधात गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

April 26, 2026
२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

April 26, 2026
शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

April 26, 2026
नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

April 26, 2026
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

April 26, 2026
जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add