Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार जिल्हा तेली कर्मचारी महासंघाचा मेळावा उत्साहात

team by team
December 10, 2022
in राजकीय
0
नंदुरबार जिल्हा तेली कर्मचारी महासंघाचा मेळावा उत्साहात
नंदुरबार l प्रतिनिधी
 नंदुरबार जिल्हा तेली कर्मचारी महासंघाचा मेळावा कन्यादान मंगल कार्यालय नंदुरबार येथे श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज जयंती निमित्ताने नुकताच साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.
 या कार्यक्रमात माजी आमदार शिरीष चौधरी ,नंदुरबार जिल्ह्याचे तेली समाज अध्यक्ष संदीप चौधरी, शहर उपाध्यक्ष सुभाष चौधरी,प्रदेश संघटन सचिव तेली महासभा अशोक चौधरी, जिल्हा  तेली समाज उपाध्यक्ष भरत चौधरी यांच्यासह जिल्ह्यातील विविध अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमात माजी आमदार शिरीष  चौधरी यांनी आपल्या मनोगतातून समाजाच्या  एकसंघतेविषयी विचार मांडले. तसेच जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचारी यांनी समाजाच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व व्यावसायिक वृद्धीसाठी कार्य करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले. तसेच समाजातील अनिष्ट रूढी -परंपरा दूर व्हाव्यात यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज असल्याचे आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
सदर कार्यक्रमात जिल्ह्यातील विविध शासकीय निमशासकीय कार्यालयात कार्यरत असणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग घेतला. तसेच नंदुरबार जिल्हा तेली कर्मचारी महासंघाच्या पुढील वाटचालीच्या संदर्भात चर्चेत विविध मुद्द्यांवर एक मत करण्यात आले.यात जिल्हा कर्मचारी महासंघ स्थापन करून कार्यान्वित करण्याबाबत निश्चित करण्यात आले. सदर कार्यक्रमास समाजातील बहुसंख्य कर्मचारी बंधू व भगिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्तविकात रमेश चौधरी यांनी कर्मचारी महासंघ स्थापन करण्याचा उद्देश सविस्तर स्पष्ट केला. सदर कार्यक्रमात कमलाकर चौधरी, मोगीलाल चौधरी, राजेंद्र चौधरी, वसंत वाघ यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांच्या एकमेकांशी परिचय करून देण्यात आला.
तेली कर्मचारी महासंघ एकत्र येण्यासाठी स्थळ विनामूल्य तसेच अल्पोहार व चहा पाण्याची व्यवस्था संदीप चौधरी ( नंदुरबार जिल्हा तेली समाज अध्यक्ष ) यांच्यामार्फत करण्यात आले होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी धर्मराज चौधरी, भूपेंद्र  चौधरी, शैलेश  चौधरी, महेश  चौधरी ,दीपक  चौधरी, कपिल चौधरी, सुनील  चौधरी,  चंद्रशेखर चौधरी ,गणेश चौधरी ,रवींद्र चौधरी, कैलास चौधरी, हरिश चौधरी, राकेश  चौधरी,अनिल चौधरी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  महेश चौधरी यांनी केले.
बातमी शेअर करा
Previous Post

जि.प.मधील काँग्रेसच्या बंडखोर सदस्यांवर कारवाईबाबत सुनावणी दरम्यान जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी सांगितले ….

Next Post

शेरावर होतो रोज पाच हजार खर्च,२५० अश्वांची विक्री तून ७० लाख रुपयांची उलाढाल

Next Post
शेरावर होतो रोज पाच हजार खर्च,२५० अश्वांची विक्री  तून ७० लाख रुपयांची उलाढाल

शेरावर होतो रोज पाच हजार खर्च,२५० अश्वांची विक्री तून ७० लाख रुपयांची उलाढाल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

April 26, 2026
२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

April 26, 2026
शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

April 26, 2026
नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

April 26, 2026
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

April 26, 2026
जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add