Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

राष्ट्रीय महामार्ग 8 वरील चाँदसैली घाटातील वाहतूक 8 जानेवारी पर्यंत बंद

team by team
December 9, 2022
in राज्य
0
राष्ट्रीय महामार्ग 8 वरील चाँदसैली घाटातील वाहतूक 8 जानेवारी पर्यंत बंद

नंदुरबार l प्रतिनिधी

रोषमाळ-कोठार-तळोदा राष्ट्रीय महामार्ग आठ रस्त्यालगत चाँदसैली घाटातील रस्त्याची दुरुस्तीची कामे करण्यासाठी अत्यावश्यक सेवा देणारी वाहन वगळता इतर वाहनासाठी मार्गावरील वाहतूक 8 जानेवारी 2023 पर्यंत बंद करण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिले आहे.

रोषमाळ-कोठार-तळोदा राष्ट्रीय महामार्ग आठ रस्त्यालगत चाँदसैली घाट (56/850 ते 64/00 लांबी) दरम्यान महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण विभागामार्फत लोखंडी विद्युत वाहिनीचे टॉवर्स उभारणीचे काम करण्यात आले आहे. काम करत असतांना विद्युत वाहिनीच्या टॉवर्स उभारण्यासाठी डोंगराळ परिसरात जागेचे खोदकाम केल्याने तेथील जागा भुसभूसीत झाली असल्याने अवकाळी पावसामुळे किंवा भुस्खलनामुळे परिसरात घाटातून मोठया प्रमाणावर दगड व माती रस्त्यावर कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे या मार्गावरील धोकादायक वळणावर तसेच आवश्यक त्या ठिकाणी संरक्षण भिंत उभारणे, खड्याने डागडुजीकरण, रस्त्यांची दुरुस्तीसाठी अत्यावश्यक सेवा देणारी वाहन वगळता 8 डिसेंबर 2022 ते 8 जानेवारी 2023 पर्यंत चाँदसैली घाट मार्गावरील वाहनांची वाहतूक बंद करुन इतर मार्गाने वळविण्यात येत आहे.

हा मार्ग रुग्णवाहिका, अग्नीशमक, गॅस सिलेंडर वाहतूक, शासकीय अन्न व धान्य वितरण इत्यादी वाहने अशा अत्यावश्यक सेवेच्या वाहनासाठीच मार्ग सुरु राहील. मार्गावर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी दिशादर्शक फलक आणि बॅकेटस लावण्यात येवून वाहतुक वळविणेबाबत कार्यवाही व उपाययोजना करुन पथकाची नियुक्ती करावी. सार्वजनिक बांधकाम विभागाने मार्गावरील रस्त्यांचे दुरुस्तीचे कामे मुदतीत पुर्ण करावी. असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

 कोपर्ली येथे विजय चौधरी यांच्या हस्ते संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजन

Next Post

सेेवानिवृत्त पोलिसांना मोफत वैद्यकीय सुविधा मिळावी, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी, कर्मचारी कल्याणकारी सेवाभावी संघटनेची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

April 26, 2026
२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

April 26, 2026
शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

April 26, 2026
नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

April 26, 2026
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

April 26, 2026
जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add