Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तळोदा येथे ११ डिसेंबरला हिंदु राष्ट्र जागृती सभा : डॉ. सतीश बागुल

team by team
December 9, 2022
in राजकीय
0
तळोदा येथे ११ डिसेंबरला हिंदु राष्ट्र जागृती सभा : डॉ. सतीश बागुल
नंदूरबार l प्रतिनिधी
भारताच्या संविधानात प्रस्तावनेत प्रत्येक नागरिकाला समता, बंधुता आणि न्याय मिळेल, असे म्हटले जाते. प्रत्यक्षात आपल्या देशात अल्पसंख्य आयोग, सच्चर आयोग, अल्पसंख्यांक विकास मंत्रालय आहे; मात्र बहुसंख्य हिंदूंना कोणतेही संरक्षण देणारे मंत्रालय आयोग नाही. देशभरात केवळ हिंदूच्याच मंदिरांचे सरकारीकरण, तर मशिदी चर्चचे सरकारीकरण का नाही ? अल्पसंख्याकांना धर्माच्या आधारावर शैक्षणिक अनुदान, मग बहुसंख्य हिंदूनी काय अपराध केला आहे ?
हे सर्व पाहता भारतात खरोखरच ‘सेक्युलर’ व्यवस्था अस्तित्वात आहे का? हिंदूंच्या हजारो युवतींना उद््ध्वस्त करणारा नवा आतंकवाद म्हणजे ‘लव्ह जिहाद’. भारतीय अर्थव्यवस्थेवरील नवे संकट ‘हलाल जिहाद’ यांसारख्या हिंदूवर होणार्‍या अनेक अन्यायांना वाचा फोडण्यासाठी, तसेच हिंदु राष्ट्राचा आवाज बुलंद करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ११ डिसेंबर २०२२ या दिवशी माळी समाज मंगल कार्यालय, तळोदा येथे सायंकाळी ५:३० वाजता हिंदु राष्ट्र-जागृती सभा आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे नंदुरबार जिल्हा समन्वयक डॉ. सतीश बागुल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या प्रसंगी डॉ. बागुल पुढे म्हणाले, ‘‘सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगढ राज्य संघटक सुनील घनवट आणि हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या कु. रागेश्री देशपांड या वक्ते म्हणून या सभेत मार्गदर्शन करणार आहेत. या सभेच्या ठिकाणी क्रांतीकारकांबद्दल माहिती देणारे फलक, हिंदूंना प्रतीदिन करावयाच्या धर्माचरणाच्या कृती, साधना यांविषयी मार्गदर्शन करणारे फलक प्रदर्शन, तसेच हिंदूंमध्ये जागृती करणार्‍या ग्रंथांचे अन् हिंदूना धर्मशिक्षण देणार्‍या विविध ग्रंथाचे प्रदर्शनही लावण्यात येणार आहे. तसेच स्वसंरक्षण प्रशिक्षण प्रात्यक्षिके दाखवण्यात येणार आहेत.’
सभेसाठी तळोदा शहर परिसरासह तालुक्यातील अनेक गावांमध्ये प्रसार चालू असून गेले महिनाभर विविध तरुण मंडळे, महिलांचे गट, ग्रामस्थ, हिंदुत्वनिष्ठ, लोकप्रतिनिधी यांच्या बैठका घेण्यात येत आहेत. कोपरा बैठका यांसमवेत भित्तीपत्रके, हस्तपत्रके, फलक लेखन, होर्डिंग, सामाजिक संकेतस्थळ यांच्या माध्यमातून व्यापक स्तरावर सभेचा प्रसार चालू आहे. अनेक युवक धर्मरक्षणाच्या कार्यात सहभागी होण्याची इच्छा प्रदर्शित करत आहेत. या सभेच्या प्रचारासाठी
१० डिसेंबर या दिवशी श्रीदत्त मंदिर (आरंभ) होऊन शहरातील मुख्य मार्गावर सकाळी १० वाजता वाहनफेरी काढण्यात येणार आहे. या फेरीत हिंदूंनी सहभागी व्हावे, तसेच  ११ डिसेंबर २०२२ या दिवशी सायं. ५:३० वा. माळी समाज मंगल कार्यालय येथे होणार्‍या सभेसाठी हिंदूंनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन डॉ. बागुल यांनी केले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

दुचाकीच्या धडकेत पादचार्‍याचा मृत्यू

Next Post

नवापूर- नगर परिषदेचा अतिक्रमणावर हातोडा

Next Post
नवापूर- नगर परिषदेचा अतिक्रमणावर हातोडा

नवापूर- नगर परिषदेचा अतिक्रमणावर हातोडा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026
नंदुरबारच्या संसदीय संकुल विकास परियोजनेतील कार्याचा डॉ. हिना गावित यांनी मांडला आढावा

नंदुरबारच्या संसदीय संकुल विकास परियोजनेतील कार्याचा डॉ. हिना गावित यांनी मांडला आढावा

June 23, 2026
शहादा पोलिसांची धडक कारवाई; ९० लाखांचा विदेशी मद्यसाठा व कंटेनर जप्त, दोघांना अटक

शहादा पोलिसांची धडक कारवाई; ९० लाखांचा विदेशी मद्यसाठा व कंटेनर जप्त, दोघांना अटक

June 23, 2026
आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ७.५० लाखांच्या २१ दुचाकी जप्त

आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ७.५० लाखांच्या २१ दुचाकी जप्त

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add