नंदुरबार | प्रतिनिधी
तुषार बैसाणे यांचा ‘असावे कुणीतरी’ तर तन्मय जाधव यांचा ‘मयूरपंख’ या दोन्ही कविता संग्रहांचा प्रकाशन सोहळा नुकताच पार पडला.
येथील शासकीय कृषि महाविद्यालयात नुकताच कविता संग्रह प्रकाशन सोहळा पार पडला. प्रसिद्ध कवि, लेखक, जेष्ट विचारवंत तथा सिने अभिनेता तुषार बैसाणे यांचा ‘असावे कुणीतरी’ तर तन्मय जाधव यांचा ‘मयूरपंख’ हा कविता संग्रह प्रकाशित झाला. तुषार बैसाणे यांचे या अगोदर आठवण, प्रेमसागर, तू नसतांना हे कविता संग्रह, गजरी कादंबरी तर शेतकर्यांनो जागे व्हा हे आव्हानात्मक चरित्र प्रकाशित झाले आहेत,
असावे कुणीतरी हे त्यांचे सहावे पुस्तक आहे तर सयुक्त प्रकाशनामध्ये त्यांचे अकरावे पुस्तक आहे.
तन्मय जाधव यांचा मयूरपंख हा पहिलाच कविता संग्रह आहे म्हणून तन्मय जाधव आणि संपूर्ण कृषि मित्र परिवार मिळून मयूरपंख आणि असावे कुणीतरी या दोघे कविता संग्रहाचे प्रकाशन थाटामाटात संपन्न झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कृषि महाविद्यालय येथील सहयोगी अधिष्ठाता डॉ.यु.बी.होले तर प्रमुख अतिथी म्हणून जेष्ट साहित्यिक आणि व्याख्याते प्रा.डॉ.माधव कदम, पोलीस उपअधिक्षक राकेश चौधरी, सहाय्यक वनसंरक्षक धनंजय पवार, पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.एस.बी.राजपूत यांनी केले. काव्यसंग्रह परिचय डॉ.आर. ओ. ब्राम्हणे यांनी केले. मान्यवरांचा परिचय व स्वागत कु. रेणुका गावीत हिने केले. सुत्रसंचलन कु.प्राजक्ता भाकरे आणि कु. अक्षता तडवी यांनी केले.
तुषार बैसाणे आणि तन्मय जाधव यांनी प्रेक्षक रसिकांना संबोधित केले. राकेश चौधरी आणि धनंजय पवार यांनीही मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषण डॉ.यु.बी.होले यांनी केले. आभार आकाश पवार यांनी मानले.