म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील जाम येथे के.टी.वेअर बंधाऱ्यात एका व्यक्तीने उडी घेतली.गेल्या दोन दिवसापासून शोधत असूनही दिसून आले नाही. शर्तीचे प्रयत्न करूनही आढळून आला नाही. त्यावेळी शहाद्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजन मोरे त्या ठिकाणी गेले असता त्यांनी बघितलं 15 ते 20 फूट पाण्याची खोली होती.त्या ठिकाणी स्वतः व गोता खोरला सोबत घेऊन पाण्यात उतरून त्या व्यक्तीला बाहेर काढून आपले कर्तव्य बजावले.
सर्व गावकऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले असे स्वतः पाण्यात उतरून मृतदेह बाहेर काढणारे हे पहिलेच अधिकारी म्हणावे लागेल अशा अधिकाऱ्याला सलाम असे म्हणत सोशल मीडियावरुन त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.