म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील मंदाणे गावात प्रथमच महिला एकत्र येऊन गाव व परिसरात जन जागृती करण्याचा निर्धार करून गायत्री महिला भजनी मंडळाची स्थापना नुकतीच करण्यात आली आहे. या भजनी मंडळाच्या माध्यमातून गाव व परिसरात विविध उपक्रम राबवून समाज प्रबोधन करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.
मंदाणे गावात पुरुष भजनी मंडळ अनेक वर्षापासून समाजप्रबोधन करण्याचे कार्य करीत आहे. स्वतंत्र महिलांचे भजनी मंडळ असावे असा विचार पुढे आल्याने काही महिलांनी पुढाकार घेऊन गायत्री महिला भजनी मंडळाची स्थापना करण्यात आली. या भजनी मंडळातील महिला गेल्या काही महिन्यांपासून पेटी, तबला वाजविण्याचे व गायन करण्याचे कौशल्य आत्मसात करीत आहेत.
या भजनी मंडळात अरुणा भालेराव पाटील, मंगला मधुकर पवार, प्रमिला प्रभाकर सोनार, अनिता अशोक निकुंभ, इंदुबाई बापू मोरे, मंगला दयाराम बिलाडे, मालती मोतीलाल मोरे, मंगला लोटन मोरे, कुसुम दगडू मोरे, सुषमा सुभाष पाटील, हिराबाई भिका बोरसे, मनीषा मार्तंड मोरे यांचा समावेश आहे. यांना गावातील भजनी मंडळातील ज्येष्ठ कलावंत ह. भ. प. नारायण महाराज, मनिलाल हरी पटेल, दिलीप मधुसूदन पटेल, भालेराव वेडू सैदाणे, अशोक निकुंभ, सुकलाल कोळी यांचे कडून मार्गदर्शन केले जात आहे.