नंदुरबार l
शहादा तालुक्यातील खेडदिगर येथे हॉटेलमध्ये जागेचे अतिक्रमणाच्या कारणावरुन दोन गटात वाद झाला. या वादात झालेल्या भांडणात तिघांना दुखापत झाली असून परस्पर फिर्यादीतून दोन्ही गटातील २३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, शहादा तालुक्यातील खेडदिगर येथील नर्मदा नमकीन हॉटेलमद्ये प्रकाश सुदाम माळी व संतोष गुलाबराव चित्ते यांच्यात जागेच्या अतिक्रमणावरुन वाद झाला. या वादातून संतोष चित्ते यांना संतोष गुलाबराव चित्ते, भगवान रामा शिरसाठ, आनंदा भिलाजी शिरसाठ, गजानन आनंदा शिरसाठ, शैलेश ज्ञानेश्वर शिरसाठ, विनू आनंदा शिरसाठ, राजा लक्ष्मण शिरसाठ, सुदाम रामा शिरसाठ, बापू भिलाजी शिरसाठ, श्रीनात व सागर यारंनी शिवीगाळ करीत हाताबुक्यांनी मारहाण केली. तसेच जिवेठार मारण्याची धमकी दिली. याबाबत प्रकाश माळी यांच्या फिर्यादीवरुन म्हसावद पोलिस ठाण्यात १२ जणांविरोधात भादंवि कलम १४३, १४७, १४९, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.जितेंद्र पाडवी करीत आहेत.
तसेच भगवान रामदास शिरसाठ यांनी परस्पर दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, भगवान शिरसाठ यांचे काका ज्ञानेश्वर शिरसाठ व चुलत भाऊ श्रीनाथ शिरसाठ यांना दिनेश राजू चौधरी, नागू राजू चौधरी, पंकज जीवन चौधरी, रमाशंकर परशुराम महाजन, प्रकाश सुदाम महाजन, हरिहर परशुराम महाजन, गोरख प्रभाकर पाटील, पंकज जीवन रामोळे, जगिरा हिरालाल रामोळे, लखन नंदकिशोर माळी, गोपाल मनोज महाजन यांनी संगनमत करुन हॉकिस्टीक, लाठ्याकाठ्या, लोखंडी रॉडने मारहाण केली. तसेच शिवीगाळ करीत जिवेठार मारण्याची धमकी दिली. याबाबत भगवान शिरसाठ यांच्या फिर्यादीवरुन म्हसावद पोलिस ठाण्यात ११ जणांविरोधात भादंवि कलम १४३, १४७, १४८, १४९, ३२४, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुनिल बिऱ्हाडे करीत आहेत.