नंदुरबार | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी मुंबई (महाराष्ट्र शासन) याच्या सौजन्याने राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम राबविला जातो या कार्यक्रमातर्ंगत दि. १ डिसेंबर जागतीक एड्स दिन संपूर्ण जगभर साजरा केला जात आहे. युवा वर्ग हा एच आय व्ही/एडस् संदर्भात अधिक संवेदनशिल असून या युवा वर्गामध्ये एच आय व्ही / एड्स सदर्भात जागृती करणे आवश्यक आहे तसेच युवा वर्ग हा सृजनशिल असल्यामुळे विविध उपक्रमाच्या माध्यमातून त्यांच्यात जागृकता आणता येईल यासाठी जागतीक एड्स दिनाचे औचित्य साधुन आज पोलीस कवायत मैदानात आयोजीत केलेल्या रॅलीत नंदूरबार जिल्हयातील सर्व महाविद्यालयीन युवक व युवतींनी सहभाग घेतला.
सर्वप्रथम मैदानात उपस्थित युवकांना नितीन मंडलिक जिल्हा कार्यक्रम अधिकारी यानी जिल्हातील एडस स्थिती काय आहे या विषयी मार्गदर्शन केले तसेच जागतिक एड्स दिनाचे घोषवाक्य आपली एकता आपली समानता एचआयव्हीसह जगणार्या करीता यासंबंधी माहिती देण्यात आली त्याचप्रमाणे जागतीक एड्स दिनाचे औचित्य साधुन जिल्हयात विविध कार्यक्रम राबविले जाणार आहेत. त्यामध्ये महाविदयालयीन स्तरावर पोस्टर स्पर्धा आयोजीत करण्यात आल्या आहेत त्याबाबत सविस्तर माहीती देण्यात आली
तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयसीटीसी विभागाचे समुपदेशक श्री सुभाष निकम यांनी केले,
राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख यानी एच.आय. व्ही / एडस विषयी सपथ उपस्थित युवक, युवती याना दिली तदनंतर कार्यक्रमाला उपस्थित असलेले जिल्हा अल्यचिकीत्सक डॉ.चारुदत्त शिंदे यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवून रॅलीचा प्रारंभ केला. सदर रॅली पोलिस कवायत मैदान, हाट दरवाजा नगरपालिका, अंधारे स्टॉप, संगम टेकडी, बस स्टॅन्ड परीसरातून पुन्हा पूर्व स्थानावर येऊन उपस्थित युवक, युवतींना महाविदयालयातील प्राचार्य यानी मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमात जिल्हा कार्यक्रम अधिकारी नितीन मडलीक यंचे विहान संस्थेतर्फे एआरटी औषधाचा पुर्ण भारतभर तुटवडा असताना आपल्या प्रयत्नातुन उपलब्ध करून दिल्याबद्यल जिल्हा शल्यचिकीत्सक यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
सदरच्या प्रभातफेरीत एकलव्य कनीष्ठ व वरिष्ठ,नूतन महाविद्यालय, जी टी पी, श्रॉफ डिआर ज्युनिअर महीला महाविदयालय शासकीय नर्सींग विदयालय शासकीय औदयोगिक प्रशिक्षण केन्द्र व इतर महाविदयालयातील युवक युवतींनी सहभाग घेतला सदर प्रभातफेरीत नवनिर्माण संस्था , मानस फाउंडेशन, वीहान, नवचैतन्य,विघ्नहर्ता संस्था उपस्थिती लावली ,तसेच जिल्हा कार्यक्रम अधिकारी नितीन मंडलीक, वरीष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रितम पाडवी. डॉ.राजेश केसवाणी, विश्वास सुर्यवशी, नवनिर्माण संस्थेच अध्यक्ष रवी गोसावी, सोमनाथ वायफळकर, नरेंद्र सुलक्षणे, तेजल माळी, गणेश कासार, राहुल गोल्हाईत, मोग्या वळवी, गणेश कासार, हरपाल जाधव, किरण देवरे, जितेंद्र सूर्यवंशी ,महेश गवले आदि अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.तसेच विविध महाविदयालयातील सर्व प्राध्यापक व राष्ट्रीय सेवा योजनेचे पदाधिकारी, तसेच अनेक अशासकिय संस्थेतील कर्मचारी, कार्यकर्ते उपस्थित होते. सुभाष निकम यानी उपस्थितांचे आभार मानले