म्हसावद l प्रतिनिधी
प्रकाशा ते म्हसावद रस्त्यावर अज्ञात वाहनाने ठोस दिल्याने कुढावद येथील दोन जण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आज दि.१ डिसेंबर दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास काथर्दा पुनर्वसन शिवारात प्रकाशा म्हसावद रस्त्याने मोटर सायकल (क्र. MH -39-Q-4098) ने जात असताना वळण रस्त्यावर भरधाव वेगाने त्या मोटर सायकलीला अज्ञात वाहनाने ठोस दिली.या अपघातात अमृत जामा पवार ( वय-55 वर्ष) व बुध्या जंगू ठाकरे (वय -60वर्ष ) दोन्हीं रा.कुढावद ता.शहादा यांना ठोस दिल्याने ते जागीच ठार झाले.
त्यांना शवविच्छेदन करण्यासाठीं म्हसावद ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.शामा जामा पवार व रामलखन अमृत पवार यांच्या फिर्यादीवरून अज्ञात वाहनाच्या चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेच्या पुढील तपास प्रकाशा पोलीस करीत आहेत.