म्हसावद l प्रतिनिधी
सध्याच्या धक धक त्या जीवनात जीवनात माणसाला भक्तिमय वातावरण त्याचबरोबर भगवद्गीता ग्रंथाचे वाचन केल्यास जीवनात अमुलाग्र बदल घडवून जीवनसरणी उंचावण्यास मदत मिळू शकते. आजच्या युवा पिढीला गीता ग्रंथाचे प्रबोधन त्याचबरोबर प्रचाराने प्रसार करण्याची देखील गरज असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री ना.डॉ.विजयकुमार गावीत यांनी केले.

शहादा तालुक्यातील फेस फाटा येथे पंचकृष्ण मंदिर उद्घाटन श्री मूर्तीचे अनावरण तसेच पंचकृष्ण मंदिर महानुभाव आश्रमाचे उद्घाटन श्री चक्रधर स्वामी प्रभू मूर्तींचे अनावरण सदभक्तांसमवेत सामूहिक गीता पाठ श्री पंचवतार उपाहार महाप्रसाद सोहळा श्रीमद्गीता ग्रंथाचे पूजन विविध धार्मिक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परमपूज्य आचार्य श्री भास्कर बाबाजी महानुभाव होते.
तर प्रमुख अतिथी म्हणून खा. डॉ.हिना गावीत, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावीत, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती अभिजीत पाटील, डॉ संवत्सरकर बाबा महानुभाव, प पू महंत आचार्य साळकर बाबा, पातुरकर बाबा, महानुभाव सांगंदर बाबा भोजने, जिल्हा परिषद सदस्य के.डी. नाईक, महात्मा ज्योतिबा फुले युवा मंचचे अध्यक्ष ईश्वर माळी आदींसह परिसरातील संत महंत उपस्थित होते.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित म्हणाल्या की, मंदिराच्या भूमिपूजनाला माझ्या उपस्थितीत झाले त्यावेळेस मी जिल्हा परिषद सदस्य होते व आता चक्रधर स्वामींचे आशीर्वादाने मी आज जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष झाली ही तर प्रभुंचीच किमया व आशीर्वाद म्हणावा लागेल. मंदिराच्या विकासासाठी शासनाकडून जास्तीत जास्त निधी कसा उपलब्ध होईल यासाठी मी सदैव तत्पर आहे असे सांगितले.
खा डॉ हिना गावित यांनी श्रीमद्भागवत गीतेमध्ये मुळे जीवनाचा सार असून भगवत गीता जीवनाला दिशा देते. भगवद्गीतेतून सकारात्मक विचार येऊन जीवन सुंदर आणि संस्कार क्षम बनवण्याची प्रेरणा मिळते.महानुभाव संप्रदायातील आयोजीत केलेला सद्भभावना यात्रेमुळे अनेकांना जीवनात सकारात्मकता निर्माण होऊन भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, पंचावतार श्रींची मूर्ती देखील मनमोहक असून पहा त्या क्षणी दुःख विसरतो. माझ्या मतदारसंघात भक्तीने वातावरण निर्माण झाले व मला अभिमान असून धार्मिक कामाच्या विकासासाठी मी तत्पर असेल असे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प. पू. संवत्सरकर बाबा महानुभाव यांनी केले. सूत्रसंचालन पत्रकार जितेंद्र गिरासे, प. पू. गोमेराज बाबा महानुभाव यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सामाजिक कार्यकर्ते मनिलाल पाटील, उपसरपंच राकेश पाटील, माजी सरपंच मणिलाल चौधरी, योगेश पाटील यासह शहादा,शिरपूर, शिंदखेडा परिसरातील महानुभाव सांप्रदायिक तील भक्तगणांनी परिश्रम घेतले.








