म्हसावद l प्रतिनिधी
नंदुरबार जिल्हा बुद्धिबळ संघटने मार्फत खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन हिरा प्रतिष्ठान पी. के. पाटील माध्यमिक विद्यालय नंदुरबार येथे संपन्न झाल्या.
सुरुवातीला कार्यक्रमाचे उदघाटन हिरा प्रतिष्ठानचे संचालक प्रथमेश चौधरी यांचा हस्ते झाले.त्यानंतर स्विस लीग पद्धतीने फिडे नियम नुसार पाच राऊंड मध्ये स्पर्धा घेण्यात आली.बक्षीस वितरण नंदुरबार जिल्हा बुद्धिबळ असोसिएशन सचिव प्रा सुभाष मोरावकर ,नरेंद्र साबुवाला, संगीता लाखोटीया, डॉ.दिनेश देवरे यांच्या हस्ते करण्यात आले.
14 वर्ष आतील गटात खेळाडू सहभागी झाले होते. त्यातील पाच खेळाडूंना बक्षिसे देण्यात आले त्यांची नांवे अनुक्रमे कागणे प्रतिकराज, मानकर वैष्णवी,घरटे आर्या,गौतम उन्नत, परदेशी सिद्धार्थ, त्याचप्रमाणे 17 वर्ष वयोगटात अनुक्रमे शिंदे निशांत,जैन तन्वी, गोलाईत झलक ,कागणे तन्मय,मराठे जिग्नेश, यांनी बक्षिसे मिळवलीत
खुल्या गटात अनुक्रमे बोरसे वैभव,देवांग कल्पेश,खाटीक आसिम,महाजन विनीत,आमीर खान यानी बक्षिसे मिळवली विजेत्यांना रोख रक्कम ,ट्रॉफी व प्रमाणपत्रे देण्यात आले. अरबीटर म्हणून संदीप साळुंके, राहुल खेडकर,झुलेश गोसावी, यांनी भूमिका पार पाडली.स्पर्धा यशस्वी करण्यासाठी, आशिक व्होरा,डॉ. वडालकर , ऋषिकेश सोनार,प्रमोद पवार, योगेश मराठे,याचे योगदान लाभले.