नंदूरबार l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील भगदरी येथे राजीव गांधी भावनात नंदुरबार जिल्ह्यातील रामपाल महाराजांच्या सर्व भक्तांचा भगतमिलन सोहळा व सत्संगाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातून नवापूर,शहादा, तळोदा,धडगाव,अक्कलकुवा या तालुक्यातील सर्व अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यामध्ये संत रामपाल महाराज यांच्या सत्संगा मध्ये उपस्थित अनुयायांना प्रोजेक्टरच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले.
यामध्ये सत्संगात रामपालजी महाराज यांनी समाजासाठी आपण काहीतरी देणे लागतो या उद्देशाने सर्व समाजात सतभक्ती कशी दृढ होईल याकडे सर्व भक्तांनी लक्ष द्यावे तसेच या जगामध्ये सम्पूर्ण नशामुक्ती साठी नशा केल्याने होणारे दुष्परिणाम याविषयी सर्व भक्तांनी जनजागृती करावी., त्याचबरोबर हुंडा मुक्त लग्न पद्धती व लग्नात होणार वायफळ खर्च कसा वाचविता येईल या विषयी समाजप्रबोधन भक्तांनी करावे असे आवाहन केले.
त्याचबरोबर आपल्या सत्संगातून परमात्मा कबीर साहेब यांच्या विषयी सांगताना खरा परमात्मा कोण याविषयी सखोल माहिती दिली. त्याचबरोबर संत मीराबाई यांनी श्रीकृष्णाची भक्ती केल्यानंतर त्यांनी अखेर कबीर परमेश्वराला शरण जाऊन त्यांनी सांगितल्याप्रमाणे संत रविदास महाराजांकडून नाम मंत्र घेतला व स्वतःचे कसे कल्याण करून घेतले याबाबत सत्संगामध्ये विवेचन केले.
यावेळी सर्व भक्तगण त्यांचा सत्संग लक्षपूर्वक ऐकत होता.
यावेळी राजीव गांधी भवनाच्या बाहेर येणाऱ्या श्रोते वर्गाच्या स्वागतासाठी सेवेदार नेमण्यात आले होते. त्याचबरोबर चहा व पाण्याची ही व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व भक्तांनी चहापान व बिस्किटाच्या प्रसाद घेऊन व कार्यक्रमाची सांगता झाली.