नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथे संविधान दिनानिमित्त संविधान जागर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भारतीय संविधानाचा जागर व्हावा, या उद्देशाने सविंधान दिनाचे औचित्य साधून नंदुरबार जिल्हा परिषद व पंचायत समिती शिक्षण विभाग, समाज कल्याण विभाग यांच्या नेतृत्वात नंदुरबार शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन व संविधान जागर रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कमला नेहरू हायस्कूल, डीआर हायस्कूल, एकलव्य हायस्कूल, एस ए मिशन हायस्कूल, उर्दू हायस्कूल, यशवंत हायस्कूल व नॅशनल गर्ल्स हायस्कूल नंदुरबार या शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.
सदर कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित यांनी प्रमुख उपस्थिती लावली; तसेच शिक्षणाधिकारी प्राथमिक सतीश चौधरी, समाज कल्याण अधिकारी देविदास नांदगावकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत राजेंद्र पाटील, गटशिक्षणाधिकारी नंदुरबार निलेश पाटील, विस्तार अधिकारी एस. एन.पाटील, विस्तार अधिकारी जयंत चौरे, प्रशासन अधिकारी नगरपालिका भावेश सोनवणे आदी उपस्थित होते.