Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

गीता जयंतीच्या पर्वावर मानव विकास सद्भावना सप्ताह निमित्त रॅलीचे आयोजन

team by team
November 25, 2022
in सामाजिक
0
गीता जयंतीच्या पर्वावर मानव विकास सद्भावना सप्ताह निमित्त रॅलीचे आयोजन
म्हसावद  l  प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील फेस फाटा येथील श्री पंचकृष्ण मंदिराच्या माध्यमातून गीता जयंतीच्या परवावर मानव विकास सद्भावना सप्ताह निमित्त रॅली  यात्रेचे आयोजन करून समाजामध्ये शांतीचा संदेश देण्यासाठी २४ ते ३० नोव्हेंबर दरम्यान सदभावना सप्ताह रूपाने साजरा करण्यात येत आहे भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे श्रीकृष्ण मंदिराचे संचालक  डॉ महंत संवस्तकर बाबा यांनी आवाहन केले आहे.
शहादा तालुक्यातील फेस फाटा येथे  गावोगावी मानविकास सद्भावना यात्रा काढून गीता ग्रंथाचे पूजन करणे प्रत्येक गावात रॅली काढून गीता तत्वज्ञानाविषयी ओळख निर्माण करणे जनसामान्यांमध्ये संस्कार संस्कृती विषयी जनजागृती करून समाजामधील उत्थाचण करणे व श्रीमत गीते द्वारे समाजाला विश्वशांतीचा संदेश देणे अशा विविध मूल्यांना समाजात प्रेस करण्यासाठी या सद्भावना यात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
 
यात्रा शिरपूर तालुक्यातील मांजरोद आरंभ होऊन गरताड गुजर खर्दे शिरपूर वाघाडी चांदपुरी भरवाडे विक्रम हिंगणी बामखेडा वडाळी जयनगर कहाटूळ कवठळ मामाची मुलगी लोणखेडा होळ मोहिदा शहादा वरूळ व कानडी पुसनद सारंगखेडा टेंभा फेस अशा विविध गावांना दिनांक ३० नोव्हेंबर रोजी श्री पंचकृष्ण मंदिरात सामूहिक पठणाने यात्रेची सांगता होईल तसेच श्री पंचकृष्ण मंदिर महानुभाव आश्रमाचे उद्घाटन सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी च्या मूर्तीचे अनावरण सदभक्तांच्या समवेत सामुदायिक गीता पाठ श्री पंचावतार उपहार महाप्रसाद सोहळ्याचे आयोजन केले आहे.
तसेच संत महंत आचार्य वासनिक भक्तांच्या उपस्थितीत श्री पंचकृष्ण मंदिराला विशेष सहकार्य केल्याबद्दल तसेच मंत्रीपद मिळाल्याने जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचा सत्कार व सन्मान करण्यात येणार आहे.  यावेळी खा. डॉ.हिना गावित, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ सुप्रिया गावित,  जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपालसिंह रावल, सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती अभिजीत पाटील आदींसह उपस्थिती राहणार आहे. तरी परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थितीचे आवाहन डॉ. संवस्तकर बाबा यांनी केले आहे
बातमी शेअर करा
Previous Post

भालेर ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी शोभाताई प्रल्हाद पाटील यांची बिनविरोध निवड

Next Post

तरुणांना नशेपासून वाचवा, शहादा येथे नागरिकांची पोलिसांकडे मागणी

Next Post
तरुणांना नशेपासून वाचवा, शहादा येथे नागरिकांची पोलिसांकडे मागणी

तरुणांना नशेपासून वाचवा, शहादा येथे नागरिकांची पोलिसांकडे मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add