म्हसावद l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील फेस फाटा येथील श्री पंचकृष्ण मंदिराच्या माध्यमातून गीता जयंतीच्या परवावर मानव विकास सद्भावना सप्ताह निमित्त रॅली यात्रेचे आयोजन करून समाजामध्ये शांतीचा संदेश देण्यासाठी २४ ते ३० नोव्हेंबर दरम्यान सदभावना सप्ताह रूपाने साजरा करण्यात येत आहे भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे श्रीकृष्ण मंदिराचे संचालक डॉ महंत संवस्तकर बाबा यांनी आवाहन केले आहे.
शहादा तालुक्यातील फेस फाटा येथे गावोगावी मानविकास सद्भावना यात्रा काढून गीता ग्रंथाचे पूजन करणे प्रत्येक गावात रॅली काढून गीता तत्वज्ञानाविषयी ओळख निर्माण करणे जनसामान्यांमध्ये संस्कार संस्कृती विषयी जनजागृती करून समाजामधील उत्थाचण करणे व श्रीमत गीते द्वारे समाजाला विश्वशांतीचा संदेश देणे अशा विविध मूल्यांना समाजात प्रेस करण्यासाठी या सद्भावना यात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
यात्रा शिरपूर तालुक्यातील मांजरोद आरंभ होऊन गरताड गुजर खर्दे शिरपूर वाघाडी चांदपुरी भरवाडे विक्रम हिंगणी बामखेडा वडाळी जयनगर कहाटूळ कवठळ मामाची मुलगी लोणखेडा होळ मोहिदा शहादा वरूळ व कानडी पुसनद सारंगखेडा टेंभा फेस अशा विविध गावांना दिनांक ३० नोव्हेंबर रोजी श्री पंचकृष्ण मंदिरात सामूहिक पठणाने यात्रेची सांगता होईल तसेच श्री पंचकृष्ण मंदिर महानुभाव आश्रमाचे उद्घाटन सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी च्या मूर्तीचे अनावरण सदभक्तांच्या समवेत सामुदायिक गीता पाठ श्री पंचावतार उपहार महाप्रसाद सोहळ्याचे आयोजन केले आहे.
तसेच संत महंत आचार्य वासनिक भक्तांच्या उपस्थितीत श्री पंचकृष्ण मंदिराला विशेष सहकार्य केल्याबद्दल तसेच मंत्रीपद मिळाल्याने जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचा सत्कार व सन्मान करण्यात येणार आहे. यावेळी खा. डॉ.हिना गावित, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ सुप्रिया गावित, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपालसिंह रावल, सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती अभिजीत पाटील आदींसह उपस्थिती राहणार आहे. तरी परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थितीचे आवाहन डॉ. संवस्तकर बाबा यांनी केले आहे