नंदूरबार l प्रतिनिधी
तळोदा तहसील कार्यालयात तहसीलदार व अध्यक्ष गिरीश वखारे यांच्या अध्यक्षतेखाली संजय गांधी निराधार योजनेची बैठक होऊन १३६ प्रकरणे मंजूर करण्यात आल्याचे नायब तहसीलदार शैलेंद्र गवते यांनी सांगितले.
तळोदा तालुका संजय गांधी निराधार योजनेची बैठक तहसीलदार तथा अध्यक्ष गिरीश वखारे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यात संजय गांधी योजनेचे ५८ व इंदिरा गांधी योजनेचे ७८ असे एकूण १३६ प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत असे नायब तहसीलदार शैलेंद्र गवते यांनी सांगितले.
अपूर्ण कागदपत्र असलेल्या प्रकरणांना पुढील बैठकी पर्यंत कागदपत्र पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले असून एकूण १९६ प्रकरणे जमा करण्यात आली होती. त्यात १३६ प्रकरणे मंजूर केली तर ६० प्रकरणे नामंजूर करण्यात आली या बैठकीला गटविकास अधिकारी परशुराम कोकणी, मुख्य कार्यकारी अधिकारी सपना वसावा,लोटन धनगर,नायब तहसीलदार शैलेंद्र गवते आदी उपस्थित होते.