Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नवसपुर्तीसाठी काशिनाथ बाबा मंदिरावर भाविकांची गर्दी

team by team
November 24, 2022
in सामाजिक
0
नवसपुर्तीसाठी काशिनाथ बाबा मंदिरावर भाविकांची गर्दी
नंदुरबार l  प्रतिनिधी
गवळी समाजासह असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान आणि नवसाला पावणाऱ्या श्री काशिनाथ बाबा मंदिरावर आज कार्तिक अमावस्या निमित्त नवसपुर्तीसाठी भाविकांनी गर्दी केली होती.
प्रतिवर्षी कार्तिक अमावस्या निमित्त धुळे रस्त्यावरील ज्ञानदीप सोसायटीच्या  टेकडीवर  श्री काशिनाथ बाबा मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावली.सन 1970 पासून  टेकडीवर बांधण्यात आलेल्या श्री काशिनाथ बाबा मंदिराचे असंख्य भाविक आहेत.मनोकामना पूर्ण झाल्याबद्दल अनेक भाविकांनी केलेल्या नवसाची परतफेड करण्यासाठी बुधवारी भाविक मंदिरावर दाखल झाले होते.
सर्वप्रथम बालवीर चौकातून कलशधारी सुहासिनीसह  मिरवणूक काढण्यात आली.वाचत गाजत निघालेल्या मिरवणुकीत ध्वजाचे मानकरी काशिनाथ हिरणवाळे होते.बालवीर चौक, दादा गणपती, देसाईपुरा, मोठा मारुती मंदिर, धुळे नाका, वाघेश्वरी चौफुली, गोपाल नगर, ज्ञानदीप सोसायटीमार्गे टेकडीवर मिरवणूक पोहोचली.यावेळी होम हवन, पूजा अर्चा करण्यात आली.  याप्रसंगी नंदुरबारसह वावद, धुळे, मालेगाव, नगर, नाशिक, शिरपूर येथून दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी  नवस पूर्ण केले.खडतर अशा पायवाटेने भाविकांनी मंदिरावर   मार्गक्रमण केले.उत्सवाचे मानकरी यांच्या हस्ते मंदिरावर ध्वजारोहण करण्यात आले.श्री काशिनाथ बाबा मंदिराजवळ हनुमान मूर्ती आणि महादेवाची पिंड आहे.या ठिकाणी अभिषेक व आरतीनंतर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
बातमी शेअर करा
Previous Post

तळोदा येथे संजय गांधी निराधार योजनेच्या बैठकीत १२६ प्रकरणे मंजूर

Next Post

परिवहन कार्यालयामार्फत आणखी चार फेसलेस सुविधा उपलब्ध

Next Post
इलेक्ट्रीक मोटर चोरणारा सराईत टोळी जेरबंद, ३० हजाराचा मुद्देमाल हस्तगत

परिवहन कार्यालयामार्फत आणखी चार फेसलेस सुविधा उपलब्ध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026
डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

डॉ.हिना गावित यांच्या हस्ते राज्यस्तरीय आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

April 23, 2026
अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

अक्राळे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026
श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

श्रीमती क. पु.पाटील महाविद्यालयात विद्यालयात १८ तास वाचन अभियानाचा शुभारंभ

April 18, 2026
सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add