नंदुरबार l प्रतिनिधी
जल जीवन मिशन ग्रामीण अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यात मंजूर 883 नळ पाणीपुरवठा योजनांचे भूमिपूजन राज्याचे पाणीपुरवठा स्वच्छता मंत्री मा . गुलाबराव पाटील यांच्या हस्ते उद्या 24 नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे .सदर कार्यक्रम नंदुरबार येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात होणार आहे असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार डॉ. विजयकुमार गावित हे राहणार आहेत. यावेळी जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन ही करण्यात आले आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रत्येक कुटुंबाला दर मानसी 55 लिटर शुद्ध पिण्याचे नियमित पाणी मिळावे यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामपंचायत , वाडा , पाडा निहाय पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आले आहेत .या मंजुर योजनांचे भूमिपूजन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या शुभहस्ते होणार आहे. यात धडगाव व अक्कलकुवा तसेच इतर तालुक्यातील ज्या ग्रामपंचायतीमध्ये आदर्श आचारसंहिता आहे अशा ग्रामपंचायतीत मंजूर नळ पाणी पुरवठा योजनांचे भूमीपूजन कार्यक्रम वगळण्यात आले आहेत.
अध्यक्षस्थानी राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित राहणार आहेत .तर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ . सुप्रिया गावित, खासदार डॉ . हिना गावित, आ. अमरीशभाई पटेल ,आमदार डॉ . सुधीर तांबे , आमदार किशोर दराडे, आमदार आमशा पाडवी ,आमदार अँड.के .सी .पाडवी, आमदार शिरीष कुमार नाईक ,आमदार राजेश पाडवी, जिल्हाधिकारी मनीषा खत्री , पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील , जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक , सभापती गणेश पराडके ,सभापती शंकर पाडवी , सभापती संगीता भरत गावित, सभापती हेमलता अरुण शितोळे , नंदुरबार पंचायत समिती सभापती न मायाबाई मालचे , नवापूर चे पंचायत समिती सभापती बबीताबाई गावित , तळोदाचे सभापती लताबाई अर्जुन वळवी,शहादाचे सभापती विरसिंग ठाकरे , धडगावच्या सभापती सौ हिराताई पराडके, अक्कलकुवाचे सभापती मानसिंग वळवी, तसेच सर्व पंचायत समितीचे उपसभापती जिल्हा परिषदेचे व पंचायत समितीचे सर्व सदस्य उपस्थित राहणार आहेत .
जलजीवन मिशन अंतर्गत होणाऱ्या जिल्हास्तरीय कार्यशाळेस व भूमिपूजन कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व सन्माननीय सरपंच ग्रामसेवक हे उपस्थित राहणार आहेत .सदर कार्यशाळेत जिल्ह्यातील सर्व सरपंच , ग्रामसेवक तसेच ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीचे सदस्य , ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे सर्व कर्मचारी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे ,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार , प्रकल्प संचालक राजेंद्र पाटील ,जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक जयवंत उगले ,ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय बाविस्कर यांनी केले आहे.