शहादा l
धुळे येथे एफ झोन अंतर्गत झालेल्या आंतर तंत्रनिकेतन विभागीय स्पर्धेत येथील जी.एम.चौधरी तंत्रनिकेतनचा संघ विजयी झाला आहे.
दि. 19 ते 21 नोव्हेंबर दरम्यान एफ झोन अंतर्गत धुळे येथे आंतर तंत्रनिकेतन विभागीय क्रिकेट स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत धुळे,नंदुरबार व जळगाव जिल्ह्यातील औषध निर्माण शास्त्र पदविका व तंत्रनिकेतनच्या सोळा संघांनी सहभाग घेतला. चुरशीच्या अंतिम सामन्यात के.सी.ई. तंत्रनिकेतन जळगावचा पराभव करून पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ संचलित जी.एम.चौधरी तंत्रनिकेतनच्या संघाने विजेतेपद प्राप्त केले.
शहादा संघाच्या कर्णधार देवेंद्र अशोक पाटील (तृतीय वर्ष विद्युत) याला मॅन ऑफ द मॅच गौरविण्यात आले. यशस्वी संघाचे मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, सचिव श्रीमती कमलताई पाटील,प्राचार्य बी.के.सोनी, एफ झोन सचिव प्रा. एस.एन.पाटील, विभाग प्रमुख व महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी अभिनंदन केले आहे. दरम्यान, पुढील फेरीचे राज्यस्तरीय सामने पुणे येथे डिसेंबर २०२२ मध्ये होणार आहेत.