Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

स्वातंत्र्य, संविधानासाठी अक्कलकुवा ते शहादा ७५ किमी पदयात्रा

team by team
November 22, 2022
in सामाजिक
0
स्वातंत्र्य, संविधानासाठी अक्कलकुवा ते शहादा ७५ किमी पदयात्रा
म्हसावद l प्रतिनिधी
स्वातंत्र्य, संविधानासाठी अक्कलकुवा ते शहादा अशी  ७५ किमी पदयात्रा काढून साजरा होणाऱ्या संविधान सन्मान  समारोहाची बैठक बोधी वृक्ष परिसरातील विपश्यना केंद्रात संपन्न झाली.
या बैठकीला शिवाजीराव मोरे ,अनिल ओंकार कुवर , सुनील पाटोळे  पितांबर पेंढारकर   नरेंद्र दगा कुवर, नानाभाऊ शिंदे ,वेडू जगदेव  ,रमेश बिरारी ,विष्णू जोंधळे यांची बैठकीला उपस्थिती होती. बैठकीत ठरल्याप्रमाणे नियोजनावर चर्चा झाली. नियोजनानुसार शहादा तालुक्यांमध्ये मोठ्या गावांमध्ये शेवटून शहादा तालुक्यातील शेवटच्या गावापासून  शहाद्यापर्यंत मोटरसायकल रैलीचे आयोजन करण्याचे आयोजित करण्यात आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत सर्वांनी अकरा वाजेपर्यंत पोहोचून 11 पासून 12 वाजेपर्यंत मुख्य मार्गाने महापुरुषांना अभिवादन करत  डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून रॅलीचे सभेमध्ये रूपांतर होईल. या ठिकाणी नर्मदा बचाव आंदोलनाच्या सहित सर्व पुरोगामी, आंबेडकरी, बहुजन व संविधानाला मानणाऱ्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रबोधन मेळावा होईल. संविधानाच्या सन्मान करत  सांस्कृतिक कार्यक्रम  सादर होणार आहेत.
 23 नोव्हेंबर पासून अक्कलकुवा येथे सुरू होणाऱ्या पदयात्रेला नर्मदा बचाव आंदोलनाच्या प्रणेत्या मेधा पाटकर आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पदयात्रेला सुरुवात होईल. त्या त्या ठिकाणी आपापल्या चळवळीतील विद्यार्थी, सामाजिक राजकीय कार्यकर्ते, शिक्षक संघटनेचे नेते, या सर्वांनी स्त्री पुरुषांसह पदयात्रेमध्ये सहभागी व्हायचे आहे. सव्वीस तारखेला शहाद्यात जो कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रमासाठी आपापल्या गावाचे कार्यक्रम दहा-साडेदहा वाजेपर्यंत आटोपून अकरा वाजेपर्यंत शहाद्याला छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ पोहोचायचे आहे. मोटरसायकल रॅलीने आणि तिथून एकत्रित जत्था घेऊन डॉ बाबासाहेब आंबेडकरांना  अभिवादन करणार आहोत.
   संविधान सन्मान समारोह नफरत तोडो  नफरत छोडो, संविधान बचाओ भारत जोडो या अभियानामध्ये सहभागी व्हावे असे आयोजन समितीच्या वतीने आपणास कळविण्यात येत आहे.पुढची बैठक 22 नोव्हेंबरला सायंकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ सायंकाळी  ६ वाजता आयोजित करण्यात आली आहे. आपण सर्वांनी या बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन  आयोजकांनी केले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

आदिवासी सहकारी साखर कारखान्याची निवडणुकीत भाजपा तालुकाध्यक्ष भरत गावीत यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन पॅनलने सत्तेसाठी कंबर कसली

Next Post

जिल्हा नियोजन व विकास समितीच्या बैठकित ३८९ कोटीचा प्रारुप आराखड्यास मान्यता

Next Post
जिल्हा नियोजन व विकास समितीच्या बैठकित ३८९ कोटीचा प्रारुप आराखड्यास मान्यता

जिल्हा नियोजन व विकास समितीच्या बैठकित ३८९ कोटीचा प्रारुप आराखड्यास मान्यता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

गुजरातमधून एचटीबीटी बियाण्यांची महाराष्ट्रात प्रतीकात्मक एंट्री, सीमेवर शेकडो शेतकरी उपस्थित

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

June 12, 2026
शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add