नंदुरबार l
येथील सदा जनसेवा फाऊंडेेशनतर्फे सालाबादाप्रमाणे यावर्षी दि.२० नोव्हेंबर २०२२ रविवार शहीद टिपू सुलतान यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
येथील शहीद टिपु सुलतान चौक बागवान गल्ली येथे नंदुरबार शहर पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक पी.जी.पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले. यानंतर शहीद टिपू सुलतान यांना सलामी देण्यात आली. तसेच परिसरातील लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आला. यानंतर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सदा जनसेवा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते एजाज बागवान हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून माजी नगरसेवक हाजी नबा खाटीक, सामाजिक कार्यकर्ते महेमुद मन्सुरी, सदा जनसेवा फाऊंडेशनचे उपाध्यक्ष दानिश बागवान, सदस्य सलिम बागवान, संदीप बैसाणे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहर कार्याध्यक्ष कालू शाह आदी उपस्थित होते.
एजाज बागवान यांनी सांगितले की, राजकीय नेत्यांचे वाढदिवसात लाखो रुपयांचा खर्च करतात, परंतू ज्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले अशा शहीद महापुरुषांची राजकीय नेत्यांना विसर पडला आहे. शहीद टिपू सुलतान हे पहिले मिसाईल मॅन होते. त्यांच्या कारकिर्दीत सर्व धर्मांचे प्रार्थनास्थळी बांधली गेली. देशासाठी ज्या-ज्या महापुरुषांनी प्राणाची आहूती दिली, त्यांना यावेळी अभिवादन करण्यात आले. सूत्रसंचालन डॉ.आबिद बागवान यांनी केले. आभार सलिम बागवान यांनी मानले. यावेळी हे.कॉ.सुनिल मोरे, श्रीकांत पाटील, मंगलसिंग कोकणी, रतिलाल पावरा, बाला शेख, जावेद बागवान, जुबेर खाटीक, सोहेल शेख, रेहान बागवान, साजिद बागवान, श्री.चव्हाण आदी उपस्थित होते.