नवापूर | प्रतिनिधी
नंवापूर तालुक्यातील नवापूर ते लक्कडकोट दरम्यान असलेल्या कारेघाट जंगल परिसरात पोलीसांनी ७ लाख ३९ हजार २०० रुपये किंमतीची दारू जप्त केली असुन याप्रकरणी चार लाखी गाडी जप्त करीत दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, गुजराथ राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर पोलिस अधिक्षक पी.आर.पाटील तसेच अप्पर पोलिस अधिक्षक निलेश तांबे यांच्या आदेशा नुसार गुजरात राज्यात अवैधरित्या वाहतुक करणारे इसम यांच्यावर नाका बंदीच्या ठिकाणी तसेच गुजराथ राज्यात जाणारे इतर उपरस्त्यावर पेट्रोलींग करुन कार्यवाही करण्याबाबत नवापूरचे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना आदेशीत केले होते.
त्याप्रमाणे २० नोव्हेंबर रोजी ५:४५ वाजता पोलिस उपनिरीक्षक अशोक मोकळ यांच्या सोबत असई गुमानसिंग पाडवी,पोहेका दिनेश वसुले, दिनेश बाविस्कर,पंकज सुर्यवंशी,विकी वाघ,प्रशांत खैरणार,रणजीत महाले यांचे पथक पेट्रोलींग करत असतांना पोलिस निरीक्षक वारे यांना मिळालेल्या गुप्त बातमी मिळाल्या प्रमाणे बोलेरो पिक ॲप (क्र.एम.३९. ए.डी.A११८३) मध्ये दोन इसम हे नवापूरकडुन करंजी मार्गाने देशी दारु व बियरचे खोके घेऊन जाणार्या वाहणास नवापूर ते लक्कडकोट दरम्यान असलेल्या कारेघाट गावाचा जंगल परिसरात खोकरवाडा गावा जवळ वाहन अडऊन झडती घेतली असता त्या मध्ये ७ लाख ३९ हजार २०० रुपये किंमतीचे एकुण २२० नग खाकी रंगाचे पुष्ठ्याचे खोके त्यात देशी दारु सुगंधी संत्रा दारुने भरलेल्या ९३ हजार ६०० रुपये किंमतीचे एकुण ३० नग खाकी रंगाचे पुष्ठ्याचे खोके असुन प्रत्येकी खोक्यात हेर्वड्र्स ५००, प्रिमीयर स्ट्रॉंग बियर असे छापलेले बियरचे भरलेले सिलबंद पत्री टिन, ४ लाखाची एक बोलेरो पिकअप असा एकुन १२ लाख ३२ हजार ८०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदर कारवाई मध्ये वाहन चालक अबिदखान सत्तारखान सिकलीकर रा.दोशातकीया, जुनी भोईगल्ली नंदुरबार, हल्ली मुक्काम जनतापार्क, नवापुर, व त्याचा जोडीदार शैलेश कालु राठोड रा. धनलक्ष्मीपार्क, नवापुर हे मिळुन आले आहेत. पो का दिनेश बाविस्कर यांनी दिलेल्या फिर्यादी वरुन संशयीत आरोपीतांचा विरोधात नवापुर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम ६५ (ई), १०८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अशोक मोकळ करीत आहे.








