नंदुरबार| प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील एका दुकानात अमेरीकन डॉलर देवून भारतीय चलनी नोटा घेण्याबाबत चर्चा करीत असतांना गल्ल्यातून ४० हजार रोख लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दोघांविरूध्द उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार शहरातील आदर्श नगरात असलेल्या श्री शनैश्वर ट्रेडींग नावाचे तेल विक्रीचा दुकानात राजाल मोहनदास सेवलानी हे बसले असतांना त्याठिकाणी अनोळखी दोन व्यक्ती आले. त्यांनी विदेशी चलनी नोटा (अमेरीकन डॉलर) देवून भारतीय चलनी नोटा घेण्याबाबत आमिष दाखवत चर्चा सुरू केली.
या दरम्यान त्यांनी गल्यातून ५०० रूपयाच्या ८० नोटा एकूण ४० हजार रूपये लंपास केले. याप्रकरणी राजल मोहनदास सेवालनी रा.जुनी सिंधी कॉलनी (नंदुरबार) यांच्या फिर्यादीवरून दोन अनोळखी इसमांविरूध्द उपनगर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ४२०,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोसई प्रशांत राठोड करीत आहेत.








