तळोदा l प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील मोहिदा येथे प्रकाश मणिलाल पाडवी (वर्ष २६) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार मोहिदा गावातील रहिवासी सकाळी प्रातविधीसाठी रस्त्याने जात असताना गावालगत असलेल्या खळ्यांच्या परिसरात त्यांना दुर्गंधीयुक्त वास जाणवू लागला याबाबत लोकांनी गावातील उपसरपंच आनंद मराठे यांना याबाबत सांगितले. तेव्हा मराठे यांनी शोध घेतला असता.
त्यांना प्रकाश मणिलाल पाडवी रा. मोहिदा, ता.तळोदा हे एका चिंचेच्या झाडावर फासावर लटकलेले आढळून आले. याबाबत ओळख पटताच प्रकाश मनीलाल पाडवी यांचे वडील मनीलाल रमण पाडवी यांना याबाबत सूचित करण्यात आले.
या घटनेचे गांभीर्य ओळखत आनंदा मराठे यांनी मणीलाल पाडवी यांना सोबत घेत याबाबत बोरद बिटचे हवालदार गौतम बोराडे यांना घडलेल्या घटनेची माहिती दिली.त्यानुसार गौतम बोराडे यांनी आपले कर्मचारी निलेश खोंडे, विजय विसावे, छोटू कोळी, राजू जगताप,तुकाराम पावरा यांनां सोबत घेत घटनास्थळी येऊन पाहणी केली असता सदर मयत प्रकाश मनीलाल पाडवी हे नेहमी दारूच्या नशेत राहत होते असे गावकऱ्यांकडून त्यांना समजले व त्यांनी दारूच्या नशेतच गळफास घेतला असावा असे प्रथमदर्शी स्पष्ट झाले आहे. मृत्यू हा १९ ते २० नोव्हेंबर २०२२ या कालावधीत झाला असल्याचे निष्पन्न झाले आहे. याबाबत पुढील तपास हवालदार गौतम बोराडे हे करीत आहेत.








