नंदुरबार | प्रतिनिधी
एका जाहीर कार्यक्रमात राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आ.एकनाथ खडसे यांनी बंजारा समाजाबद्दल बेलात वक्तव्य केले असुन त्यांनी बंजारा समाजाची माफी मागावी अथवा अखिल भारतीय बंजारा क्रांती दलातर्फे दि.२५ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रभर निषेध आंदोलनाचा ईशारा देण्यात आला आहे.
या निवेदनात म्हटले आहे कि, दोन दिवसांपासून समाज माध्यमांवर जळगांव जिल्ह्यातील एका जाहीर कार्यक्रमात राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आ.एकनाथ खडसे यांनी बंजारा समाजाबद्दल बेलात वक्तव्य केले असल्याची क्लिप फिरत आहे. यामुळे महाराष्ट्रातील बंजारा समाज हा अशांत झाला आहे व बंजारा समाजातील अबालवृदांच्या मनामध्ये एकनाथ खडसेंच्या नावाची चिड निर्माण झाली आहे. काही कारण नसतांना किंवा कुठल्याही निवडणुका अथवा ठोस असा विषय नसतांना बंजारा समाजाबद्दल एका कार्यक्रमात आ.एकननाथ खडसे यांनी बंजारा समाजाचा रोष ओढवून घेतला आहे.
आ.एकनाथ खडसे हे ज्येष्ठ नेते असून त्यांची अशाप्रकारे कार्यक्रमाता बंजाराच नव्हे तर कुठल्याही जाती अगर धर्मावर बोलतांना भान ठेवले पाहिजे. राज्यात बंजारा समाज एक कोटीच्या घरात असून देशभरात सुमारे ११ कोटींच्या जवळपास असल्यामुळे राजकीय व्यक्तींनी बंजारा समाजावर बोलतांना भाव ठेवणे गरजेचे आहे. अन्यथा जो बंजारा समाजाच्या विरोधात बोलेल त्याच्या पक्षाची महाराष्ट्रात वाताहत होईल याची नोंद वाचाळवीरांनी घ्यावी.
एकनाथ खडसे यांनी कमीत कमी बंजारा समाजावर अभ्यास करून बोलावे. आ.खडसे यांनी बंजारा समाजाची माफी मागावी किंवा राष्ट्रवादच्या ज्येष्ठ नेतांनी एकनाथ खडसे यांचे कान टोचून त्यांना बंजारा समाजाची माफी मागायला लावावी अन्यथा अखिल भारतीय बंजारा क्रांती दलातर्फे दि.२५ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रभर नेते आ.निलय नाईक, प्रदेशाध्यक्ष श्रावण चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली बंजारा स्टाईने निषेध आंदोलन छेडले जाईल. असे अखिल भारतीय बंजारा क्रंाती दलाचे प्रदेशाध्यक्ष श्रावण चव्हाण यांनी पत्रकाद्वारे केले आहे. यासंदर्भात आंदोलनाची दि.२३ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे अखिल भारतीय बंजारा क्रांती दलाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक बोलविण्यात आली आहे.








