नंदुरबार l
अक्कलकुवा शहरात असलेले बीएसएनएल कार्यालय फोडून चोरट्याने १० हजार रुपये किंमतीचे डिझेज इंजिनचे अल्टरनेटर चोरुन नेल्याची घटना घडली.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, अक्कलकुवा शहरात बीएसएनएलचे कार्यालय आहे. सदर कार्यालयाच्या इंजिन रुमचे मागील बाजूची खिडकी तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. यावेळी इंजिन रुममध्ये असलेले १० हजार रुपये किंमतीचे डिझेज इंजिनचे अल्टरनेटर चोरट्यांनी चोरुन नेले.
याबाबत बीएसएनएलचे कनिष्ठ दुरसंचार अधिकारी विकासकुमार दुर्गालाल महावर यांच्या फिर्यादीवरुन अक्कलकुवा पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादंवि कलम ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.गोविंद जाधव करीत आहेत.








