Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

हेल्मेटचा वापर करण्यासाठी जिल्हा पोलीस दलातर्फे हेल्मेटसह मोटार सायकल रॅली

team by team
November 18, 2022
in क्राईम
0
हेल्मेटचा वापर करण्यासाठी जिल्हा पोलीस दलातर्फे हेल्मेटसह मोटार सायकल रॅली

नंदुरबार |  प्रतिनिधी

 

नंदुरबार येथे हेल्मेटचा वापर करण्यासाठी जिल्हा पोलीस दलातर्फे हेल्मेटसह मोटार सायकल रॅलीचे आयोजन आज  करण्यात आले होते. पहिल्यांदाच नागरिकांनी हेल्मेटचा वापर करण्यासाठी जनजागृतीसाठी मोटार सायकल रॅलीचे आयोजन केल्यामुळे ती पाहण्यासाठी नंदुरबार शहराच्या रस्त्यावर लोकांनी प्रचंड गर्दी केली होती.

 

पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी घेतलेल्या मासिक गुन्हे आढावा बैठकीत असे निदर्शनास आले की, राष्ट्रीय, राज्य व इतर रस्ते अपघातांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असुन रस्ते अपघातांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या संख्येमध्ये देखील वाढ होत आहे. रस्ते अपघतांमध्ये मृत्यु होणार्‍यांमध्ये दुचाकीस्वारांची सख्या जास्त असल्यामुळे रस्ते अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे नागरिकांनी दुचाकी वाहनाचा वापर करतांना हेल्मेटचा वापर करण्यासाठी जनजागृती रॅलीचे आयोजन आज नंदुरबार शहरातील नेहरु पुतळा येथे करण्यात आले होते. रस्ते अपघतांमध्ये होणारी वाढ कमी करणे हा मोटार सायकल रॅलीमागील मुख्य उद्देश होता.

 

नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पहिल्यांदाच नागरिकांनी हेल्मेटचा वापर करण्यासाठी जनजागृतीसाठी मोटार सायकल रॅलीचे आयोजन केल्यामुळे ती पाहण्यासाठी नंदुरबार शहराच्या रस्त्यावर लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. सदर मोटार सायकल रॅलीला नंदुरबार शहरातील नागरिकांनीही तेवढ्याच उत्साहाने प्रतिसाद देत पोलीस अधिकारी व अमंलदार यांच्या मोटार सायकल रॅलीवर फुलांचा वर्षाव करुन रॅलीचा उत्साह वाढविला.

 

 

 

सदरची रॅली ही नंदुरबार शहरातील नेहरु पुतळा येथुन निघून नगरपालिका चौक, डॉ. अंधारे चौक, मोठा मारुती, देसाई पेट्रोल पंप, दो-शहा तकिया, छत्रपती शिवाजी महाराज चौक, जळका बाजार, सोनार खुंट, महाराष्ट्र व्यायाम शाळा, म. गांधी पुतळा, उड्डाणपुल मार्गे गिरीविहार गेट, सी. बी. पेट्रोल पंप व पुन्हा नेहरु पुतळा या मार्गाने रॅलीने मार्गक्रमण केले व नेहरु पुतळा येथे सदर रॅलीचे समारोप झाला. हेल्मेट परिधान केलेले पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या रॅलीने नंदुरबारवासीयांचे लक्ष वेधून घेतले.

 

 

सदरची मोटार सायकल रॅली चालू असतांना आजुबाजूला उपस्थित असलेले लोक त्यांच्या मोबाईलमध्ये मोटार सायकल रॅलीचे चित्रीकरण करत होते तसेच टाळ्या वाजवून मोटार सायकल रॅलीचे मनोबल वाढवत होते.
नंदुरबार जिल्हा पोलीस दलात सद्या हेल्मेट सक्ती अनिवार्य केल्यामुळे सर्व पोलीस सद्या हेल्मेट परिधान करीत आहेत. तसेच मोटार सायकल रॅलीतील पोलीस अधिकारी व अमंलदार यांनी हेल्मेट परिधान करून आपल्या जीवनात दुचाकी चालवितांना प्रत्येक नागरिकाला हेल्मेटचे महत्व लक्षात आणून दिले. तसेच प्रत्येक नागरिकाने आपल्या कुटुंबाच्या भवितव्यासाठी हेल्मेट वापरावे असे आवाहन देखील नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी केले.

 

 

सदर मोटार सायकल रॅलीच्या वेळी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्यासह नंदुरबार जिल्ह्यातील इतर अधिकारी व नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील सुमारे २० पोलीस अधिकारी व ५० पोलीस अमंलदार हे हेल्मेटसह रॅलीला उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

शेतकऱ्यांना मिळाला बाजार समिती निवडणूक लढविण्याचा अधिकार भाजपा आ.राजेश पाडवी यांच्याकडून शिंदे – फडणवीस सरकारचे अभिनंदन

Next Post

आमदाराची मागणी केली स्थगित, हर घर नल से जल’ योजनेचे कार्यारंभ आदेश झाले वाटप, मात्र कामांना सुरुवात होणार कधी? जि.प.सदस्यांचा संतप्त सवाल

Next Post
आमदाराची मागणी केली स्थगित,  हर घर नल से जल’ योजनेचे कार्यारंभ आदेश झाले वाटप, मात्र कामांना सुरुवात होणार कधी? जि.प.सदस्यांचा संतप्त सवाल

आमदाराची मागणी केली स्थगित, हर घर नल से जल' योजनेचे कार्यारंभ आदेश झाले वाटप, मात्र कामांना सुरुवात होणार कधी? जि.प.सदस्यांचा संतप्त सवाल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026
नंदुरबारच्या संसदीय संकुल विकास परियोजनेतील कार्याचा डॉ. हिना गावित यांनी मांडला आढावा

नंदुरबारच्या संसदीय संकुल विकास परियोजनेतील कार्याचा डॉ. हिना गावित यांनी मांडला आढावा

June 23, 2026
शहादा पोलिसांची धडक कारवाई; ९० लाखांचा विदेशी मद्यसाठा व कंटेनर जप्त, दोघांना अटक

शहादा पोलिसांची धडक कारवाई; ९० लाखांचा विदेशी मद्यसाठा व कंटेनर जप्त, दोघांना अटक

June 23, 2026
आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ७.५० लाखांच्या २१ दुचाकी जप्त

आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ७.५० लाखांच्या २१ दुचाकी जप्त

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add