नंदुरबार l
शहरातील एका पेट्रोल पंपाशेजारी असलेल्या बॅटरी व ऑईलचे दुकान फोडून चोरट्यांनी सुमारे ७० हजार रुपये किंमतीची बॅटरी व ईन्व्हर्टर चोरुन नेल्याची घटना घडली.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार येथील विकास प्रकाश मराठे यांचे श्री राधेकृष्ण बॅटरी व आईलचे दुकान आहे. सदर दुकानाच्या शटरची कडी तोडून शटर उघडून चोरट्यांनी आत प्रवेश केला.
यावेळी दुकान असलेल्या ६९ हजार ४०० रुपये किंमतीचे पाच नग बॅटरी व ईन्व्हर्टर चोरट्यांनी चोरुन नेले. याबाबत विकास मराठे यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भादंवि कलम ३८०, ४५४, ४५७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.अतुल बिऱ्हाडे करीत आहेत.








