नंदुरबार l
भारतीय जनता पार्टीच्या पंचायतराज व ग्रामविकास विभागाच्या उत्तर महाराष्ट्र सहसंयोजकपदी नंदुरबारचे कमल ठाकूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते कमल ठाकूर यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
नंदुरबार येथील भाजपाचे जिल्हा कोषाध्यक्ष कमल ठाकूर यांच्या कार्याची दखल घेऊन भाजपा पंचायत राज व ग्रामविकास विभाग उत्तर महाराष्ट्र सहसंयोजकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशान्वये भाजपा पंचायत राज व ग्रामविकास विभाग महाराष्ट्र प्रदेश संयोजक गणेशकाका जगताप यांनी कमल ठाकूर यांची भाजपा पंचायत राज व ग्रामविकास विभाग उत्तर महाराष्ट्र सहसंयोजकपदी नियुक्ती केली आहे.
मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे व भाजपा पंचायतराज ग्रामविकास विभागाचे प्रदेश संयोजक गणेशकाका सोमनाथ जगताप यांच्या हस्ते कमल ठाकूर यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. याप्रसंगी भाजपा अनुसूचित जमाती मोर्चाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष संतोष वसईकर, जिल्हा उपाध्यक्ष युवराज राजपुत, रामन दुसेजा आदी उपस्थित होते.
कमल ठाकूर यांची उत्तर महाराष्ट्र संयोजकपदी नियुक्ती झाल्याबद्दल राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. डॉ.विजयकुमार गावित, भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या खा. डॉ. हिना गावित, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, माजी आमदार शिरीष चौधरी, जि.प. अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, प्रा. डॉ. रवींद्र चौधरी, डॉ. विक्रांत मोरे यांनी सत्कार केला. कमल ठाकूर यांनी यापूर्वी नंदुरबार नगरपालिकेचे नगरसेवक, रेल्वे सल्लागार समिती सदस्य व सिंधी समाज युवा मंचचे माजी अध्यक्ष आणि पुज्य अपरसिंध पंचायतचे उपाध्यक्ष म्हणून काम केले आहे. या नियुक्तीबद्दल कमल ठाकूर यांचे सर्वच स्तरावरून कौतुक होत आहे.








