Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मराठा समाजातील बेरोजगार युवकांना व्यवसायासाठी बँकांकडून कर्ज मिळावे ,मुख्यमंत्र्यांकडे मागणी

team by team
November 17, 2022
in राज्य
0
मराठा समाजातील बेरोजगार युवकांना व्यवसायासाठी बँकांकडून कर्ज मिळावे ,मुख्यमंत्र्यांकडे मागणी

नंदुरबार  l

मराठा समाजातील बेरोजगार युवकांसाठी व्यवसायाकरीता असलेल्या अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळामार्फत व्यवसाय निर्मितीसाठी नंदुरबार शहरासह जिल्ह्यातील बँकांकडून कर्ज देण्यास टाळाटाळ होत आहे. व्यवसायासाठी बँकांकडून कर्ज त्वरीत उपलब्ध करुन देण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे नंदुरबार शहर समन्वयक प्रविण महेश मराठे यांनी केली आहे.

याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, मराठा समाजातील युवक-युवतींनी स्वतःच्या पायावर उभे रहावे, तसेच त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी महाराष्ट्र राज्य शासनामार्फत अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाकडून व्यवसायासाठी कर्ज उपलब्धतेची योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत बँकेकडून व्यवसायाकरीता कर्ज उपलब्ध करुन दिले जाते.

परंतु नंदुरबार शहरासह जिल्ह्यातील अनेक बँकांकडून वेगवेगळ्या अटी-शर्ती टाकून मराठा समाजातील युवक-युवतींना व्यवसाय, रोजगारासाठी असलेल्या अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजनेच्या लाभापासून वंचित ठेवले जात आहे. योजनेमार्फत बँकांकडून मराठा समाजातील युवकांनी कर्जाची मागणी केल्यावर मालमत्ता गहाण ठेवण्यास बंधनकारक केले जात आहे. आवश्यक कागदपत्रे देवुन देखील कर्ज घ्यावयाचे असेल तर मालमत्ता गहाण ठेवणे आवश्यक असेल, असे सांगितले जाते.

तसेच कर्ज देण्यासाठी फिरवाफिरव केली जाते? संबंधित बँक अधिकार्‍यांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जातात, यामुळे स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी व्यवसाय निर्मितीकरीता कर्ज घेणार्‍या मराठा समाजातील युवकांना योजनेच्या लाभापासून वंचित ठेवण्याचा प्रकार बँकेकडून सुरु आहे. म्हणुन यासंदर्भात आपण त्वरीत दखल घेवुन मराठा समाजातील युवकांना अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळामार्फत मिळणार्‍या कर्ज योजनेचा लाभ त्वरीत मिळवुन द्यावा, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे नंदुरबार शहर समन्वयक प्रविण महेश मराठे यांनी निवेदनातून केली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

भाजपा पंचायतराज, ग्रामविकास विभाग उत्तर महाराष्ट्र सहसंयोजकपदी कमल ठाकूर यांची नियुक्ती

Next Post

गत वर्षांच्या तुलनेत यंदा रस्ते अपघात मृत्यूसंख्येत घट

Next Post
गत वर्षांच्या तुलनेत यंदा रस्ते अपघात मृत्यूसंख्येत घट

गत वर्षांच्या तुलनेत यंदा रस्ते अपघात मृत्यूसंख्येत घट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add