Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पिंप्रापाणी व भांगारापाणी येथे किशोरींची आरोग्य विषयक कार्यशाळा उत्साहात

team by team
November 17, 2022
in आरोग्य
0
पिंप्रापाणी व भांगारापाणी येथे किशोरींची आरोग्य विषयक कार्यशाळा उत्साहात

नंदूरबार l प्रतिनिधी
दि सुप्रिम इंडस्ट्रीस लि. पुरस्कृत याहामोगी आदिवासी बहुउद्देशीय विकास संस्थेच्या फिरता दवाखाना व किशोरींचे आरोग्य शिक्षण उपक्रमांतर्गत मौजे पिंप्रापाणी व भांगारापाणी तालुका अक्कलकुवा येथे किशोरींची आरोग्य विषयक कार्यशाळा संपन्न झाली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस आशा कार्यकर्ती व किशोरींनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले. रुषा पाडवी (किशोरी समन्वयक ) यांनी वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता तसेच मासिक पाळीत घ्यावयाची काळजी या विषयी मार्गदर्शन केले.

रंजना नवेज (परिचारिका) यांनी विविध प्रकारचे आजार, थंडीच्या दिवसात त्वचेचे आजार व शरीराची घ्यावयाची निगा याविषयी मार्गदर्शन केले.

विठ्ठल कदम माजी अध्यक्ष बाल कल्याण समिती नंदुरबार यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की बाल विवाह, बाल मजुरी ला आळा घातला पाहिजे. शासनाच्या शिक्षणासाठी आश्रमशाळा,स्कॉलरशिप, वसतिगृह तसेच उच्च शिक्षणासाठी सुविधा आहेत तर त्याचा लाभ घेतला पाहिजे.लहान मुला मुलींनी गुड टच बॅड टच बाबतीत जागृत असावे.आपले ध्येय प्रथम शिक्षण दुसरे नोकरी व व्यवसाय आणि नंतर विवाह असावे तरच बाल विवाहास आळा बसेल.
यादरम्यान वजन, उंची, BMI, BP, हिमोग्लोबिन तपासण्यात आले. या वर्षी सर्वांचे हिमोग्लोबिन 10 च्या वरती दिसून आले.

किशोरींनी दोरीवरील उड्या, फुटबॉल, लगोरी खेळून कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेतला तसेच आरोग्यविषयक पोस्टरांचे सामूहिक वाचन केले. कार्यशाळेची सांगता “बाल विवाह न करण्याच्या प्रतिज्ञा ” म्हणून केली.

कार्यशाळेचे आयोजन डॉ. वज्रेश्वरी वसावे व संस्थेच्या अध्यक्षा वंदना पावरा यांच्या मार्गदर्शनाखाली आशा कार्यकर्ती साबलीताई वसावे, सरिता पाडवी, मोहिनी पाडवी, फुलवंती वळवी, मीनाक्षी तडवी यांनी केले.

बातमी शेअर करा
Previous Post

पुणे येथे आकीब धोबी यांचा समाज गौरव पुरस्काराने सन्मान

Next Post

उपजिविका व सामाजिक सुरक्षा योजना कार्य शाळेत बचत गटातील महिलांचा सहभाग

Next Post
उपजिविका व सामाजिक सुरक्षा योजना कार्य शाळेत बचत गटातील महिलांचा सहभाग

उपजिविका व सामाजिक सुरक्षा योजना कार्य शाळेत बचत गटातील महिलांचा सहभाग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

नांदरखे येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा

June 23, 2026
श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

श्रीमती कमलताई पुरुषोत्तम पाटील विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 23, 2026
देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

देशाच्या राज्य क्रीडा मंत्र्यांसमवेत डॉ. हिना.गावित यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योग दिवस

June 23, 2026
नंदुरबारच्या संसदीय संकुल विकास परियोजनेतील कार्याचा डॉ. हिना गावित यांनी मांडला आढावा

नंदुरबारच्या संसदीय संकुल विकास परियोजनेतील कार्याचा डॉ. हिना गावित यांनी मांडला आढावा

June 23, 2026
शहादा पोलिसांची धडक कारवाई; ९० लाखांचा विदेशी मद्यसाठा व कंटेनर जप्त, दोघांना अटक

शहादा पोलिसांची धडक कारवाई; ९० लाखांचा विदेशी मद्यसाठा व कंटेनर जप्त, दोघांना अटक

June 23, 2026
आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ७.५० लाखांच्या २१ दुचाकी जप्त

आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ७.५० लाखांच्या २१ दुचाकी जप्त

June 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add