Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

प्रजापिता ब्रह्मकुमारी परिवारातर्फे निझर येथे भव्य प्रदर्शन देखावा

team by team
November 17, 2022
in राज्य
0
प्रजापिता ब्रह्मकुमारी परिवारातर्फे निझर येथे भव्य प्रदर्शन देखावा
नंदुरबार l प्रतिनिधी
प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय माउंट आबू राजस्थान संचलित निझर सेवा केंद्रातर्फे निझर( गुजरात) येथे भव्य प्रदर्शन देखाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.नवदुर्गा दर्शनासह बारा ज्योतिर्लिंग देखावा लक्षवेधी ठरला असून दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या आहेत.
नंदुरबार जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या गुजरात राज्यातील निझर येथील संगीता नगर, अंबाजी मंदिरा समोर भव्य प्रांगणात प्रदर्शनाचे उद्घाटन तापी जिल्हा प्रभारी तथा शहादा तळोदा विभागाचे आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते झाले. विश्व कल्याणासाठी प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाचे कार्यअलौकिक असल्याचे प्रतिपादनआमदार राजेश पाडवी यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी नंदुरबार लोकसभा क्षेत्राच्या खासदार डॉ. हिना गावित  यांनी प्रदर्शनाला भेट देऊन नंदुरबारला देखील याचप्रमाणे भव्य प्रदर्शन भरवण्याचा मानस व्यक्त केला .दि. 20 नोव्हेंबर पर्यंत दररोज सायंकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत प्रदर्शनी भाविकांसाठी खुली राहणार आहे.प्रदर्शनी मध्ये भव्य प्रकाश व ध्वनी व्यवस्था सुसज्ज असून चाळीस फूट उंच भव्य चैतन्यदायी देवींचा देखावा सादर करण्यात आला आहे. यात बारा ज्योतिर्लिंग दर्शनासह अध्यात्मिक लाईट व साऊंडद्वारे परमात्मा अवतरण देखावा,
भव्य ब्रह्मांड, आकाश, पाताळ आणि पृथ्वी अशा तिन्ही लोकांचे दर्शन प्रोजेक्टरद्वारे सादरीकरण करण्यात येत आहे. तसेच व्यसन मुक्तीवर प्रभावी पथनाट्य लक्षवेधी ठरले आहे.येत्या 20 नोव्हेंबर पआहेंत भाविकांनी या भव्य प्रदर्शनीचा लाभ घेण्याचे आवाहन  निझर केंद्राच्या संचालिका कमलदीदी आणि  नंदूभाई तसेच प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयओम शांती परिवारातर्फे करण्यात आले आहे.प्रदर्शन संयोजनासाठी नंदुरबार आणि खापर सेवा केंद्राचे सहकार्य लाभले आहे.
बातमी शेअर करा
Previous Post

मोलगीचा चनवाईपाडा येथे ॲपेरिक्षाची वाहनाला धडक

Next Post

राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला समर्थन करण्यासाठी नवापूर शहरातून काँग्रेसच्या वतीने बाईक रॅली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add