नंदुरबार l
शहादा शहरातील कोर्टासमोर दुचाकीने पुढे जाणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने दोघांना दुखापत झाली आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, शहादा येथील जगदिश गोपाल कापडे व स्वरा जगदिश कापडे हे दोघेजण दुचाकीने (क्र.एम.एच.१८ बीपी ०४२७) शहादा शहरातील डोंगरगाव रस्त्याने जात होते. यावेळी सोहेल शेख जमील शेख याने त्याच्या ताब्यातील दुचाकी (क्र.जी.जे. ०५ एफआर ३३३७) रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात दुचाकी चालवून कोर्टासमोरील रस्त्यावर दुचाकीला मागून धडक दिली.
यात दुचाकीवरील गोपाल कापडे व स्वरा कापडे यांना दुखापत झाली. याबाबत आकाश सुरेश शिंपी यांच्या फिर्यादीवरुन शहादा पोलिस ठाण्यात सोहेल शेख याच्याविरोधात भादंवि कलम २७९, ३३७, ३३८ मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुनिल पाडवी करीत आहेत.








