नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथे जनजाती गौरव दिनानिमित्त आदिवासी विकास विभाग प्रकल्प कार्यालयामार्फत महिला व विद्यार्थिनीची रॅली काढण्यात आली.

रॅलीच्या शुभारंभ जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुप्रिया गावित व उपाध्यक्ष सुहास नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रकल्प अधिकारी मीनल कर्णवाल जिल्हा परिषदेच्या सदस्य राजश्री गावित यांचा सह अधिकारी कर्मचारी व विद्यार्थिनी उपस्थित होते. रॅली दरम्यान खा. डॉ.हिना गावित, जिल्हा परिषद अध्यक्ष सुप्रिया गावित, राजश्री गावित यांनी रॅलीत पारंपारिक नृत्यात सहभाग नोंदविला.








