Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अरे व्वा : नंदूरबार जिल्ह्यातील सुपूत्रास दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी पुरस्काराने सन्मानीत

team by team
November 16, 2022
in राष्ट्रीय
0
अरे व्वा : नंदूरबार जिल्ह्यातील सुपूत्रास दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी पुरस्काराने सन्मानीत
नंदुरबार l प्रतिनिधी
 शहादा तालुक्यातील देऊर येथील रहिवासी रवि राजपूत यांना ‘दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी पुरस्कारातील चित्रपट सृष्टीत सर्वोत्कृष्ट गारमेंट सप्लायरचा पुरस्कार केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
मुंबईत नुकताच विविध क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी चित्रपट अभिनेते अमन वर्मा, शांती प्रीया, रुपल पटेल, चारुल मलिक, शरद मल्होत्रा, रोहितेश गौर, विदिशा श्रीवास्तव, चारुल मलिक, अनुप उपाध्याय उपस्थित होते. रवी राजपूत हे देऊर ता. शहादा येथील एका शेतकरी कुटूंबात जन्मले. त्यांनी सुरत येथे कापड उद्योग क्षेत्रात अथक परिश्रम करून विविध उद्योग उभारले आहेत. ते साई ड्रेसेसचे संस्थापक तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.
त्यांच्या उद्योगामाफ्त आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना उद्योग उभारणीसाठी वस्तू उपलब्ध करून देतात. महिलांना प्रोत्साहन देऊन त्यांना घरबसल्या कपड्यांचा व्यवसाय करण्यास प्रवृत्त करतात. आता पर्यंत त्यांनी अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.
भारतीय वस्त्र आणि वस्त्र पुरवठादारामध्ये महत्त्वपूर्ण योगदानासाठी त्यांना बॉलीवूड पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
पुरस्कार नवीन उर्जा प्रदान करतो हा पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करताना रवी राजपूत यांनी सांगितले की, आमच्या अथक परिश्रमाने आम्ही कापड उद्योगातील एक उत्कृष्ट उत्पादक म्हणून कार्य करीत आहोत. पुरस्कार आपल्याला एक नवीन ऊर्जा देतो आणि त्याचबरोबर भविष्यात आणखी चांगले काम करण्यासाठी प्रोत्साहन देतो.
बातमी शेअर करा
Previous Post

जनजाती गौरव दिनानिमित्त आदिवासी विकास विभागातर्फे रॅली

Next Post

ग्रामीण भागात रोजगार निर्मितीसाठी केंद्र शासनाकडून १० हजार कोटी मिळणार – पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026
अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

April 25, 2026
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना  महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

April 25, 2026
दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

April 25, 2026
मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add