दररोज मोठ्या प्रमाणात रस्ते वाहतूक अपघाताचे प्रमाण वाढत असून रस्ते वाहतूक अपघातातमध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे असे रस्ते अपघात होत असतात. त्यामुळे मनुष्यहानी होवून वाहनांचेही नुकसान होते.यामुळे नंदुरबार पोलीसांनी सदरची बाब गांभीर्याने घेवून अपघात होत असलेल्या ठिकाणांची माहिती प्राप्त केली. सदर ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग व परिवहन विभाग यांची मदत घेवून रस्ते दुरुस्ती, फलक, रस्त्यांवरील अडथळे हटविणे यासारख्या आवश्यक त्या उपाययोजना केल्या. तसेच मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्यात आल्याने वर्षभरात रस्ते अपघातांची संख्या घटली असून यात मृत्यूमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण वर्षभरात २६ ने कमी झाले असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे.
पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी नंदुरबार जिल्ह्यात रस्ते वाहतूक अपघातातील मृत्युंचे प्रमाण पाहून ते प्रमाण कमी करण्याचा निश्चय केला. याकामी सार्वजनिक बांधकाम विभाग, परिवहन विभाग यांचे सहकार्य घेवून नंदुरबार जिल्ह्यात रस्ते वाहतूक अपघाताचे प्रमाण कमी करण्याचे निश्चित केले. यामुळे रस्ते अपघात होत असलेल्या ठिकाणांची माहिती प्राप्त केली. सदर ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग व परिवहन विभाग यांची मदत घेवून रस्ते दुरुस्ती, फलक, रस्त्यांवरील अडथळे हटविणे आदी आवश्यक त्या उपाययोजना केल्या. मद्यपी वाहन चालकांवरही कारवाई करण्यात आली.या कारवाईमध्ये मद्यपी वाहन चालकांचे वाहतूक परवाने रद्द होण्याचे प्रस्ताव उप प्रादेशिक परिवहन विभाग, नंदुरबार यांना सादर केले. परिणामस्वरुपी आज पावेतो एकूण-१६९ मद्यपी वाहन चालकांचे वाहतूक परवाने देखील रद्द करण्यात आले आहेत.
वारंवार अपघात होणारी ठिकाणे निश्चित करुन, अपघातांच्या कारणांचा अभ्यास करुन त्या त्रुटी दुर केल्या. रस्त्यांवरील वळणे तसेच खड्डे दुरुस्ती, घाटात कठडे बसवून घेणे या सारख्या उपाययोजना करण्यात आल्या. यासाठी संबधित विभाग प्रमुखांची बैठक पोलीस अधीक्षक यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आली होती. यात अपघाताबाबत विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली होती.
नंदुरबार जिल्हा घटकात रस्ते वाहतूक अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांमुळेच सन २०२१ च्या तुलनेत सन २०२२ या चालू वर्षात आजपावेतो रस्ते वाहतूक अपघाती मृत्युंची संख्या तब्बल २६ ने कमी करण्यात नंदुरबार जिल्हा पोलीस दलाला यश मिळाले आहे. परिवहन विभाग यांचे सहकार्याने राबविलेल्या उपाययोजनेमूळेच यावर्षी नंदुरबार जिल्ह्यात रस्ते वाहतूक अपघात व यात अपघाती मृत्युंची संख्या कमी होण्यास मदत झालेली आहे.यापुढेही जिल्ह्यातील रस्ते अपघातातील मृत्युंचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात येत असुन दारु पिऊन वाहन चालवितांना कोणी दुचाकी, चारचाकी स्वार आढळुन आल्यास त्यांचेवर अधिक कठोर कारवाई करुन लायसन्स निलंबित करण्याची कारवाई करण्यात येईल,असे पोलीस अधीक्षक,नंदुरबार यांनी सांगितले.
रस्त्यावर लावण्यात आलेल्या निर्देशक फलकांचा नागरिकांनी वापर करावा, दारु पिऊन कोणीही वाहन चालवू नये, दारु पिऊन वाहन चालविणे केवळ त्यांच्यासाठीच नव्हे तर इतरांचे जिवितासदेखील धोकेदायक आहे. नागरीकांनी स्वत:चे व इतरांच्या सुरक्षिततेसाठी वाहतुकीचे नियमांचे पालन करावे.
-पी.आर.पाटील, पोलीस अधीक्षक,नंदुरबार








